‘सिंघम’ फेम सुहासिनी देशपांडे यांचं निधन, कधी आणि कुठे होणार अंत्यसंस्कार?

Suhasini Deshpande Death: मराठी सिनविश्वातील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन झालं आहे. सुहासिनी देशपांडे यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

'सिंघम' फेम सुहासिनी देशपांडे यांचं निधन, कधी आणि कुठे होणार अंत्यसंस्कार?
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 10:52 AM

Suhasini Deshpande Death: झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मराठी सिनविश्वातील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन झालं आहे. सुहासिनी देशपांडे यांच्या निधनामुळे सिनेविश्वात आणि चाहत्यांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सुहासिनी देशपांडे यांनी मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सुहासिनी देशपांडे यांच्या निधनामुळे कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सुहासिनी देशपांडे यांच्या मनोरंजन विश्वातील योगदानाबद्दल सांगायचं झालं तर, सुहासिनी देशपांडे यांनी वयाच्या अवध्या 12 व्या वर्षापासून अभिनय विश्वात करियरला सुरुवात केली. सुहासिनी देशपांडे यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीचं मोठं नुकसान झालं आहे… असं म्हणायला हरकत नाही.

सुहासिनी देशपांडे यांनी तब्बल 70 वर्षांपेक्षा अधिक काळ अभिनय विश्वात काम केलं. सुहासिनी देशपांडे यांनी त्यांच्या करियरमध्ये 100 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. मानाचं कुंकू (1981), कथा (1983), आज झाले मुक्त मी (1986), आई शापथ (2006) चिरंजीव (2016), ‘ढोंडी’ आणि 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाकाल’ सिनेमात सुहासिनी देशपांडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हे सुद्धा वाचा

अभिनेता अजय देवगन स्टारर ‘सिंघम’ सिनेमात देखील सुहासिनी देशपांडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘सिंघम’ सिनेमात सुहासिनी देशपांडे यांनी अभिनेत्री काजल अग्रवाल हिच्या आजीची भूमिका बजावली होती. ‘सिंघम’ सिनेमानंतर सुहासिनी देशपांडे कोणत्याच सिनेमात दिसल्या नाहीत. ‘सिंघम’ सिनेमाच सुहासिनी देशपांडे यांचा अखेरचा सिनेमा ठरला.

सुहासिनी देशपांडे यांचं कधी आणि कुठे होणार अंत्यसंस्कार?

सुहासिनी देशपांडे यांच्या निधनाने सेलिब्रिटी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुहासिनी देशपांडे यांच्या निधनानंतर अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत. तर पुण्यात सुहासिनी देशपांडे यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. बुधवारी, 28 ऑगस्ट रोजी सुहासिनी देशपांडे यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.