Singham Again: अजय देवगण-अर्जुन कपूरची कमाल कामगिरी; पण दीपिका..; ‘सिंघम अगेन’चा पब्लिक रिव्ह्यू
रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहिलेल्यांनी ट्विटरवर आपापली मतं मांडण्यास सुरुवात केली आहे. काहींनी अजय देवगणचा अभिनय आवडला तर काहींनी अर्जुन कपूरच्या भूमिकेचं कौतुक केलं.
रोमान्स, ड्रामा, ॲक्शन, कॉमेडी.. या सगळ्यांचा तडका दिग्दर्शिक रोहित शेट्टीच्या चित्रपटांमध्ये पहायला मिळतो. बॉलिवूडमधील मसालापट म्हटलं की रोहित शेट्टीचे चित्रपट आवर्जून त्या यादीत मोडतात. असाच एक पॉवरपॅक्ड चित्रपट त्याने दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. ‘सिंघम अगेन’ असं या चित्रपटाचं नाव असून तो थिएटरमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली आहे. हा चित्रपट पाहिलेल्यांनी ट्विटरवर आपली मतं मांडण्यास सुरुवात केली आहे. रोहित शेट्टीचा हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट त्यांना कसा वाटला, याविषयी ते पोस्टद्वारे लिहित आहेत.
‘सिंघम अगेन’मध्ये अभिनेता अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत असून प्रेक्षकांना त्याचा अभिनय खूप आवडला आहे. या चित्रपटात बऱ्याच सेलिब्रिटींनी पाहुण्या कलाकाराच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यापैकी शक्ती शेट्टीच्या भूमिकेतील दीपिका पादुकोणने मात्र प्रेक्षकांची निराशा केली आहे. ‘दीपिकाची एण्ट्री अजून चांगली करता आली असती. तिच्या भूमिकेने खूपच निराशा केली आहे’, असं एका युजरने लिहिलं आहे. ‘सिंघम अगेनने चांगलंच खिळवून ठेवलं आहे. अजय देवगणसाठी हा चित्रपट नक्की पहावा’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘अजय देवगणचा हा आतापर्यंतचा सर्वांत बेस्ट परफॉर्मन्स आहे’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.
Deepika Padukone as Shakti Shetty… But what a cringefest entry of Deepika. I mean Deepika’s entry could have been much much better. Utterly disappointed ☹️.#DeepikaPadukone #BajiraoSingham #SinghamAgain pic.twitter.com/FfnySCZG1d
— 𝐒𝐚𝐭𝐲𝐚𝐣𝐢𝐭 (@TheCynicalRuler) November 1, 2024
Ajay Devgn is on fire! 🔥 His best performance yet! #SinghamAgain #SinghamAgainReview pic.twitter.com/iQBsXbRAqw
— Ɓ (@whoismrbhuwan) November 1, 2024
काहींनी अर्जुनच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. ‘ये बंदा अब तक कहा था? जबरदस्त’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्याची प्रशंसा केली आहे. ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात टायगर श्रॉफ, अक्षय कुमार, रणवीर सिंह, करीना कपूर खान आणि जॅकी श्रॉफ यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा रामायण या पौराणिक कथेच्या आधारावरून साकारल्याचं म्हटलं जातंय. यात अजय देवगणने प्रभू श्रीराम, करीनाने सीता आणि अर्जुन कपूरने रावणाची भूमिका साकारली आहे.
Arjun Kapoor looks really amazing through all these good actors.. I think he was used amazingly by Rohit Shetty. #ArjunKapoor #SinghamAgain pic.twitter.com/NoORY2h6Jy
— 𝐒𝐚𝐭𝐲𝐚𝐣𝐢𝐭 (@TheCynicalRuler) November 1, 2024
‘सिंघम अगेन’ची ॲडव्हान्स बुकिंग आणि प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता पहिल्याच दिवशी तगडी कमाई होण्याची शक्यता वर्तवली जातेय. हा चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशी देशभरात 35 ते 40 कोटी रुपये कमावणार असल्याचं म्हटलं जातंय. ‘सिंघम’ फ्रँचाइजीमधील हा तिसरा चित्रपट आहे. तर रोहित शेट्टीच्या पोलिसांच्या चित्रपटांच्या यादीतील हा पाचवा चित्रपट आहे. याआधी त्याने सिंघम, सिंघम रिटर्न्स, सिम्बा आणि सूर्यवंशी हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते.