शत्रुघ्न सिन्हांसाठी या निर्माता, दिग्दर्शकाची खास पोस्ट; पूनम सिन्हाबाबत म्हणाले…
Sonakshi Sinha - Zaheer Iqbal: सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलांमध्ये वाद, खास क्षणासाठी सोनाक्षीचं माहेर - सासर आलं एकत्र, अभिनेत्रीचे भाऊ मात्र गायब...., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी सिन्हा हिच्या कुटुंबाची चर्चा...
‘दबंग’ फेम अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने नुकताच बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केलं आहे. तब्बल सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनीलग्नाचा निर्णय घेतला. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. झहीर याच्यासोबत लग्न केल्यामुळे सोनाक्षी प्रचंड आनंदी आहे. आता देखील सोनाक्षी हिचा एका फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये सोनाक्षी हिच्यासोबत माहेर आणि सासरची मंडळी देखील दिसत आहेत.
सांगायचं झालं तर, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि पत्नी पूनम सिन्हा यांच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी दोन्ही कुटुंबं एकत्र आले होते. फोटोमध्ये दिग्दर्शक सुभाष घाई देखील दिसत आहेत. त्यांनीच सिन्हा आणि इक्बाल कुटुंबासोबत क्लिक केलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
सुभाष घाई खास फोटो पोस्ट करत म्हणाले, माझा पहिला मित्र आणि मुंबईतील पहिला हिरो… पूनम माझी मानलेली बहीण आहे. तिच कन्यादान मी केलं आहे…’ सध्या फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम 9 जुलै 1980 विवाहबंधनात अडकले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंदाच्या क्षणी सोनाक्षीचे सासरे इक्बाल रतनसी देखील उपस्थित होते.
सिन्हा आणि इक्बाल कुटुंबियांनी मिळून अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि पत्नी पूनम सिन्हा यांच्या लग्नाचा 44 वा वाढदिवस साजरा केला. पण यावेळी सोनाक्षी सिन्हा हिचे दोन्ही भाऊ लव आणि कुश दिसले नाहीत. आई-वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लव याने देखील फोटो पोस्ट केला. पण त्यामध्ये सोनाक्षी नव्हती. त्यामुळे भाऊ – बहिणीच्या नात्यात कटूता असल्याचं स्पष्ट होत आहे.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नात देखील भाऊ उपस्थित नव्हते. ज्यामुळे तुफान चर्चा रंगली होती. शिवाय लव सतत सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट देखील करत होता. सध्या सर्वत्र सिन्हा कुटुंबाच्या खासगी गोष्टी सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.