Manoj Bajpayee | ‘दवाई हैं…’, प्रत्येक सीनपूर्वी वोडकाचा शॉट का घेतो मनोज? खुद्द अभिनेत्याने सांगितलं सत्य
'दवाई हैं...', प्रत्येक सीन शूट करण्यापूर्वी मनोज बाजपेयी घेतो वोडकाचा एक शॉट? अभिनेत्याने सांगितलेल्या एका गोष्टीवर तुमचा विश्वासही बसणार नाही...

मुंबई | अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या उत्तम कामगिरीमुळे चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकारणाऱ्या मनोज बाजपेयी याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील आपल्या अभिनयाची जादू दाखवली. ‘द फॅमिली मॅन’ आणि ‘सिर्फ एक बंदा काफी है’ सिनेमामुळे मनोजच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. ‘सिर्फ एक बंदा काफी है’ सिनेमातील अभिनेत्याच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. ‘सिर्फ एक बंदा काफी है’ सिनेमात अभिनेत्याने एका वकिलाच्या भूमिकेला न्याय दिला आहे. पण सध्या अभिनेत्याबद्दल एक चर्चा रंगत आहे आणि ती म्हणजे मनोज बाजपेयी प्रत्येक सीन शूट करण्यापूर्वी वोडकाचा एक शॉट घेतो. यावर खुद्द अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने रंगणाऱ्या चर्चांबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. अभिनेता म्हणाला, ‘जेव्हा मी सिनेमाचं शुटिंग करत होतो, तेव्हा एका ज्यूनियर मुलीने मला विचारलं, ‘सर तुम्ही पीत आहात ते काय आहे?’ मी त्या मुलीला म्हणालो, ‘औषध आहे..’ यावर ती मुलगी मला म्हणाली, ‘आमच्या कलाकारांच्या ग्रुपमध्ये अशी एक अफवा आहे की, तुम्ही प्रत्येक सीन शूट करण्यापूर्वी वोडकाचा एक शॉट घेता…’
अशात अफवांना पूर्णविराम देत अभिनेता म्हणाला, ‘मुर्खांनो.. मी मेहनत करत आहे.. हे तुम्हाला दिसत नाही. तुम्ही सर्वांनी होम्योपॅथी औषधांना वोडका शॉट करुन ठेवलं आहे. अभिनयाचं रहस्य वोडका कसं असू शकतं…’ असं देखील अभिनेता म्हणाला. सध्या मनोज बाजपेयी त्याच्या अभिनय क्षेत्रातील कामगिरीमुळे तुफान चर्चेत आहे..




एवढंच नाही तर, अभिनेत्याने मुलाखतीत मिळत असलेल्या मानधनाबद्दल देखील मोठं वक्तव्य केले. ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजबद्दल अभिनेत्याने एक मोठं सत्य सांगितलं.. ‘फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमध्ये तुला तगडं मानधन मिळालं असेल… असा प्रश्न विचारल्यानंतर अभिनेता म्हणाला, ‘ओटीटीवाले फक्त प्रसिद्ध आणि नामवंत कलाकारांना अधिक मानधन देतात.’
अभिनेता पुढे म्हणाला, ‘ ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमध्ये मला जेवढं मानधन मिळायला हवं होतं, त्यापेक्षा फार कमी मानधन मिळालं.’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या हॉलिवूड स्टार्सबद्दल धक्कादायक माहिती देत मनोज बाजपेयी म्हणाला, ‘गोरा आल्यानंतर त्याला तगडं मानधन मिळतं. चीनमध्ये मोठ्या ब्रँडचे कारखाने आहेत कारण तेथील मजदूरी स्वस्त आहे. त्याच प्रमाणे आम्ही देखील स्वस्त मजदूर आहोत..’ असं देखील अभिनेता म्हणलाा..