‘हे तुला शोभतं का?’, सीतेची भूमिका साकारलेली अभिनेत्री बिकिनी घातल्याने ट्रोलर्सच्या निशाण्यावर

पौराणिक मालिकांमधील भूमिकांमुळे तुला ट्रोल केलं जातंय का असा सवाल केला असता तिने उत्तर दिलं, "मला माझ्या पौराणिक भूमिकांना आणि इतर मालिकांमधील भूमिकांना प्रेक्षकांकडून समान प्रेम मिळालं आहे," असं ती म्हणाली.

'हे तुला शोभतं का?', सीतेची भूमिका साकारलेली अभिनेत्री बिकिनी घातल्याने ट्रोलर्सच्या निशाण्यावर
Shivya PathaniaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 7:48 AM

मुंबई : टीव्ही अभिनेत्री शिव्या पठानियाने ‘बाल शिव’ आणि ‘राम सिया के लव कुश’ यांसारख्या मालिकांमध्ये पार्वती आणि सीतेची भूमिका साकारली होती. ‘राधाकृष्ण’ या मालिकेत तिने राधाची भूमिका साकारली होती. नुकतेच तिने सोशल मीडियावर स्वत:चे बिकिनीतील काही फोटो पोस्ट केले आहेत. हे पाहून चाहते तिच्यावर चांगलेच भडकले आहेत. पार्वती, सीता आणि राधा यांसारख्या पवित्र भूमिका साकारल्यानंतर तिने असे अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान करू नयेत, अशी भूमिका टीकाकारांनी मांडली आहे. त्यावर आता अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिव्याने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शिव्या म्हणाली, “मी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय करतेय आणि लोक माझ्या भूमिकांमुळे माझ्याशी जोडले गेले आहेत. त्याशिवाय मी अनोख्या स्टाइलचे कपडे परिधान करणारी मुलगी आहे आणि लहानपणापासूनच मला फॅशन, मेकअप यांसारख्या गोष्टींची आवड आहे. जेव्हा मी बिकिनीतील माझे फोटो पोस्ट केले तेव्हा लोकांनी त्यावर नकारात्मक कमेंट्स करण्यास सुरुवात केली. मात्र काहींनी त्यावर सकारात्मक कमेंटसुद्धा लिहिल्या आहेत.”

हे सुद्धा वाचा

बिकिनीवरील ट्रोलिंगबाबत शिव्या पुढे म्हणाली, “लोकांनी मला अशा पद्धतीचे कपडे न घालण्याचा सल्ला दिला. मी कोणते कपडे परिधान केले पाहिजेत, कोणते नाही यावर ते सल्ले देऊ लागले आहेत. पण बीचवर बिकिनी घालणं सर्वसामान्य नाहीये का? मी सर्वांच्या मतांचा आदर करते, मात्र मी हे सांगू इच्छिते की माझ्या कपड्यांवरून माझी ओळख निर्माण होत नाही. माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवरून माझ्या खऱ्या आयुष्याची झलक फॉलोअर्सना पहायला मिळते. यापुढेही मी चाहत्यांसोबत ते शेअर करेन. अर्थात कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत याची मी काळजी घेईन.”

पौराणिक मालिकांमधील भूमिकांमुळे तुला ट्रोल केलं जातंय का असा सवाल केला असता तिने उत्तर दिलं, “मला माझ्या पौराणिक भूमिकांना आणि इतर मालिकांमधील भूमिकांना प्रेक्षकांकडून समान प्रेम मिळालं आहे. मग ती मालिका ‘हमसफर’ असो किंवा ‘एक रिश्ता साझेदारी का’ किंवा ‘शूरवीर’ असो. मला सर्व भूमिकांसाठी भरभरून प्रेम मिळालं आहे.”

शिवानीला बिकिनीवरून ट्रोल केल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहित त्यावर प्रतिक्रिया दिली होती. या पोस्टमध्ये तिने लिहिलं, ‘अत्यंत साफ मनाने मी हे सांगू इच्छिते की पौराणिक भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने मी आभारी आहे. मी त्यासाठी स्वत:ला खूप नशिबवान समजते. कला सादर करायच्या या प्रवासाला मी अक्षरश: जगले आहे. देवाकडून आशीर्वाद मिळणं आणि प्रेक्षकांकडून अशा पद्धतीचं प्रेम मिळणं याची कल्पना कोणीच करू शकत नाही. माझ्यातील अभिनेत्रीचं समाधान करण्यासाठी, एक कलाकार म्हणून स्वत:ची वृद्धी करण्यासाठी मला चौकटीबाहेरच्या अनेक भूमिका साकाराव्या लागतील असं मला वाटतं.’

‘माझ्या पोस्टवर नकारात्मकता पसरवणाऱ्या काही ट्रोलर्सना मी सांगू इच्छिते, मी या गोष्टीला मानते की अभिनेता किंवा व्यक्ती म्हणून एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याला पाठिंबा देण्याचं महत्त्व ट्रोलर्सपेक्षा अधिक असतं. लहानपणापासून मी हे पाहत आली आहे की महिलांना त्यांच्या पसंतीचे कपडे परिधान केल्यामुळे त्यांच्यावर लज्जास्पद कमेंट केले जातात, त्यांना मारलं जातं. फार कमी वयापासून मी अशा अडथळ्यांमधून पुढे आले आहे आणि रुढीवादी कल्पनांशी लढत आले आहे. स्त्रियांच्या कपड्यांची निवड हे तिचं चारित्र्य, तिचं संगोपन आणि तिची नितीमूल्ये कधीच प्रतिबिंबित करत नाहीत. हे सर्व संपवण्यासाठी मी माझ्या आतापर्यंतच्या प्रवासाचा भाग असलेल्या प्रत्येकाचं कौतुक करते आणि माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागते’, असंही तिने पुढे लिहिलं आहे.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.