शाहरुख खानचं स्मृती इराणी यांच्या लेकीसोबत खास कनेक्शन ; खुद्द केंद्रीय मंत्री यांनी सांगितलं सत्य
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील पठाण सिनेमाबद्दल सांगताना केला मोठ्या गोष्टीचा खुलासा ..., स्मृती इराणी यांची लेक आणि शाहरुख खान यांच्यात काय आहे कनेक्शन ? एकदा नक्की वाचा
मुंबई : अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. पठाण प्रदर्शित होण्यापूर्वी अनेकांनी सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. पठाण सिनेमाच नाहीतर, यापूर्वी देखील अनेक सिनेमांवर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली. बॉलिवूडमध्ये सध्या सुरु असलेल्या बायकॉट ट्रेंडचा परिणाम अनेक सिनेमांवर झाला. पण कोणत्याही वादाचा परिणाम पठाण सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर झालेला नाही. शाहरुख खान स्टारर पठाण सिनेमाने जगभरात जवळपास ८५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. पठाण सिनेमाचं यश पाहता अनेकांनी सिनेमाचं आणि कलाकारांचं कौतुक केलं. नुकताच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील पठाण सिनेमाबद्दल सांगताना मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे.
एका मुलाखतीत स्मृती इारणी यांनी शाहरुख खान याच्याबद्दल विचारण्यात आलं. यावर स्मृती इराणी म्हणाल्या, ‘फार कमी लोकांना माहिती आहे, की माझ्या मोठ्या मुलीचं नाव खुद्द शाहरुख खान याने ठेवलं आहे.’ शिवाय स्मृती इराणी यांचे पती आणि शाहरुख खान गेल्या ३० वर्षांपासून मित्र असल्याचं देखील केंद्रीय मंत्री यांनी सांगितलं आहे.
स्मृती इरणी पुढे म्हणाल्या, ‘अभिनेत्याबद्दल लोकं जे काही बोलत आहेत, त्यामध्ये काहीही तथ्य आणि सत्य नाही… आज प्रत्येक कलाकाराचा आदर केला जातो. पण कोणावर आक्षेप घेणं योग्य नाही. लोकांनी स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ नये. विरोध करायचाच असेल तर, एका चौकटीत राहून करावा….’ असं देखील स्मृती इराणी म्हणाल्या.
स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, ‘आज प्रेक्षकांकडे अनेक पर्याय आहे. सिनेमागृहात नाही तर, ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक सिनेमे पाहू शकतात. पण सिनेमाची कथा चांगली असेल तर प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात नक्की गर्दी करतीलच…’ असं देखील स्मृती इराणी म्हणाल्या.
एक काळ असा होता, तेव्हा स्मृती इराणी टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून चर्चेत होत्या. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेमध्ये त्यांनी ‘तुलसी’ या भूमिकेला न्याय देत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण काही वर्षांनी त्यांनी कलाविश्वाला रामराम ठोकत राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला.
शाहरुख खान याच्याबद्दल यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, चार वर्षांनंतर अभिनेत्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्याने ‘पठाण’ सिनेमाचं प्रमोशन देखील केलेलं नाही. तरी देखील सिनेमाने भारतात आतापर्यंत ४२२ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर जगभरात सिनेमाने ८५० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. त्यामुळे पुढे सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.