“त्या 4 दिवसांमध्ये..”; मासिक पाळीतील भरपगारी रजेबद्दल ‘झिम्मा 2’च्या टीमचं काय मत?

मासिक पाळीत महिलांना भरपगारी रजा देण्याबद्दल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जे वक्तव्य केलं, त्यावरून विविध मतं मांडली जात आहेत. 'झिम्मा 2'च्या टीमनेही त्याविषयी आपलं मत मांडलंय. दिग्दर्शक हेमंत ढोमे, क्षिती जोग, निर्मिती सावंत आणि सिद्धार्थ चांदेकर हे त्याबद्दल काय म्हणाले, ते पाहुयात..

त्या 4 दिवसांमध्ये..; मासिक पाळीतील भरपगारी रजेबद्दल 'झिम्मा 2'च्या टीमचं काय मत?
झिम्मा 2 टीमImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 1:43 PM

मुंबई : 18 डिसेंबर 2023 | केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळीत महिलांना भरपगारी रजा देण्याबाबत केलेलं वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. मासिक पाळी हे काही शारीरिक अपंगत्व नाही, त्यामुळे भरपगारी रजा देण्याचा प्रश्नच येत नाही, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. काहींनी त्याचं समर्थन केलं तर काहींनी विरोध केला. आता महिलांचे भावविश्व मांडणाऱ्या ‘झिम्मा 2’ या चित्रपटातील कलाकारांनी आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनं त्यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत ते मासिक पाळीतील रजेविषयी मोकळेपणे व्यक्त झाले.

हेमंत ढोमे- “आपले आजी-आजोबा घरातल्या मुलींना सांगायचे की त्या चार दिवसांत देवघरात, किचनमध्ये जायचं नाही. याचा अर्थ अस्पृश्य वगैरे काही नाही तर माणुसकीचं कारण होतं. या चार दिवसांमध्ये महिलेला, मुलीला थकवा नको म्हणून ते तसं सांगायचे. आपण आता त्याचा अर्थ काहीतरी वेगळा काढलाय. गावाकडे अजूनही या गोष्टीकडे मॉडर्न पद्धतीने बघितली जातं. प्रत्येकाच्या शरीरावर ती गोष्ट अवलंबून आहे. कोणाला त्याचा त्रास होतो, तर कोणाला होत नाही. पण हे काय अपंगत्व नाही, असं म्हणायची गरज नाही. ही एक शारीरिक गोष्ट आहे आणि त्याचा आदर सर्वांनीच केला पाहिजे. माझ्या टीममधल्या मुली, स्त्रिया मला हक्काने मेसेज करू शकतात. हे असंच राहिलं पाहिजे. त्या दिवसांमध्ये महिलांना शारीरिक विश्रांती देणं गरजेचं आहे, असं माझं मत आहे,” असं हेमंत म्हणाला.

क्षिती जोग- “मासिक पाळी हे अपंगत्व नाही, हे मला मान्य आहे. पण मला स्वत:ला भयंकर त्रास होतो. मला उभं राहता येत नाही, नीट बसता येत नाही. माझी रडारड होते. पहिले दोन दिवस मला खूप त्रास होतो. अशावेळी मी कामावर असताना मला घरी जायची मुभा दिलेली आहे. मासिक पाळीचा त्रास हा माणसागणिक बदलतो. त्यामुळे या विषयाकडे दुर्लक्ष करणं किंवा ती गोष्ट अशीच सोडून देणं योग्य वाटत नाही,” असं मत क्षितीने मांडलं.

हे सुद्धा वाचा

निर्मिती सावंत- “काही गोष्टी महिलांच्या फायद्यासाठी असतात, तर काही पुरुषांच्या फायद्यासाठी असतात. त्यात योग्य समन्वय साधला पाहिजे. अशी महिला समानता होऊच शकत नाही. पण माझं एवढंच म्हणणं आहे की व्यक्तीगणिक ती गोष्ट बदलत जाते, त्रास बदलत जातो. त्यावर चर्चा व्हायला हवी,” असं निर्मिती सावंत म्हणाल्या.

सिद्धार्थ चांदेकर- “हेमंत, क्षिती आणि निर्मिती यांनी जे म्हटलंय, त्याच्याशी मी सहमत आहे. कारण व्यक्तीनुसार त्याचा त्रास वेगळा होतो. काहीजण त्यात सर्व कामं करू शकतात तर काही जणी नाही करू शकत. पण ज्या महिलेला किंवा मुलीला त्याचा त्रास होतो, तिला घरी जाण्याचा अधिकार नक्की असावा,” असं मत सिद्धार्थने मांडलं.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.