गर्भपातानंतर एकता कपूरला दाखवावे लागले पुरावे, दुसऱ्याच दिवशी बोलावलं कामावर; स्मृती इराणींचा खुलासा

स्मृती इराणी यांनी 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेत तुलसीची भूमिका साकारली होती. या मालिकेतून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्याच वेळी त्या 'रामायण' या मालिकेत देवी लक्ष्मी आणि सीता या भूमिका साकारत होत्या.

गर्भपातानंतर एकता कपूरला दाखवावे लागले पुरावे, दुसऱ्याच दिवशी बोलावलं कामावर; स्मृती इराणींचा खुलासा
Smriti Irani Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 10:24 AM

नवी दिल्ली : अभिनेत्री आणि राजकारणी स्मृती इराणी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गर्भपाताच्या घटनेविषयीचा खुलासा केला. गर्भपातानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेच्या सेटवर परतण्यास सांगितलं होतं. त्यावेळी स्मृती यांनी निर्माती एकता कपूरला वैद्यकीय कागदपत्रं दाखवत खरंच गर्भपात झाल्याचं सिद्ध करावं लागलं होतं. कारण एका सहकलाकाराने एकताला सांगितलं होतं की स्मृती गर्भपाताबद्दल खोटं बोलतेय. त्याचवेळी त्या ‘रामायण’ या मालिकेसाठीही काम करत होत्या. या मालिकेचे दिग्दर्शक रवी चोप्रा यांना जेव्हा स्मृती यांच्या गर्भपाताविषयी समजलं, तेव्हा त्यांनी आराम करण्यास सांगितलं होतं.

“गर्भपातानंतर माणुसकीबद्दल एक शिकवण मिळाली”

स्मृती इराणी यांनी ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेत तुलसीची भूमिका साकारली होती. या मालिकेतून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्याच वेळी त्या ‘रामायण’ या मालिकेत देवी लक्ष्मी आणि सीता या भूमिका साकारत होत्या. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्मृती यांनी शूटिंगदरम्यान झालेल्या गर्भपाताच्या घटनेविषयी सांगितलं. गर्भपातानंतर माणुसकीविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट शिकायला मिळाली, असंही त्या म्हणाल्या. स्मृती यांना त्यावेळी आपण गरोदर असल्याचं माहित नव्हतं.

नर्सने पाहिलं तेव्हा आधी मागितला ऑटोग्राफ

या मुलाखतीत स्मृती म्हणाल्या, “मला माहित नव्हतं की मी गरोदर होते. मी सेटवर काम करत होते आणि तब्येत बरी वाटत नसल्याने मी घरी जाण्याची परवानगी मागितली. मात्र जोपर्यंत त्यांनी मला जाण्याची परवानगी दिली, तेव्हा संध्याकाळ झाली होती. डॉक्टरांनी मला सोनोग्राफी काढण्याचा सल्ला दिला होता. मात्र रस्त्यातच रक्तस्राव होऊ लागला. त्यावेळी पाऊस पडत होता आणि मी रिक्षाचालकाला थेट रुग्णालयात नेण्यास सांगितलं. जेव्हा मी रुग्णालयात पोहोचली, तेव्हा नर्सने धावत येऊन आधी माझा ऑटोग्राफ मागितला. मी तिला ऑटोग्राफ दिला आणि विचारलं, मला ॲडमिट कराल का? कदाचित माझा गर्भपात झाला आहे.”

हे सुद्धा वाचा

दुसऱ्याच दिवशी कामावर परतल्या

स्मृती इराणी यांनी सांगितलं की ‘क्योंकी सास भी..’च्या शूटिंग शेड्युलला पुढे ढकलणं खूप सोपं होतं. कारण त्यात इतर 50 महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. मात्र रामायण मालिकेविषयी असं करता येऊ शकत नव्हतं. स्मृती यांनी जेव्हा ‘क्योंकी सास भी..’च्या टीमला फोन करून गर्भपाताविषयी सांगितलं, तेव्हा त्यांनी कामावर परतण्यास सांगितलं.

रामायणच्या टीमने दिला पाठिंबा

स्मृती इराणी त्यावेळी डबल शिफ्टमध्ये काम करत होत्या. रामायण मालिकेचे दिग्दर्शक रवी चोप्रा यांना जेव्हा त्यांनी गर्भपाताविषयी सांगितलं तेव्हा त्यांनी स्मृती यांना आराम करण्याचा सल्ला दिला. “त्यांनी मला म्हटलं की तुझं डोकं ठिकाणावर आहे का? बाळाला गमावण्याचं दु:ख काय असतं ते तुला माहितीये ना? तुला कामावर येण्याची गरज नाही. आम्ही सांभाळून घेऊ”, असं स्मृती यांनी सांगितलं.

एकता कपूरला दाखवले गर्भपाताचे पुरावे

गर्भपातानंतर दुसऱ्याच दिवशी त्या ‘क्योंकी सास भी..’च्या सेटवर परतल्या होत्या. त्याविषयी स्मृती यांनी पुढे सांगितलं, “एका सहकलाकारने निर्मात्यांना सांगितलं की मी खोटं बोलतेय. मात्र मला माझ्या घराचे हफ्ते भरायचे होते, म्हणून मी कामावर परतले होते. मला पैशांची गरज होती. दुसऱ्या दिवशी मी एकता कपूरकडे सर्व वैद्यकीय कागदपत्रं घेऊन गेले. त्यांना सांगितलं की हा ड्रामा नाही. मी त्यांना म्हटलं की भ्रूण वाचू शकलं नाही, नाहीतर तेसुद्धा दाखवलं असतं. हे ऐकून एकता कपूर अस्वस्थ झाल्या होत्या. कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही असं त्या म्हणाल्या.”

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...