पायऱ्यांवरून घसरून प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; अवघ्या 29 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

| Updated on: Jun 13, 2023 | 11:53 AM

गेल्या काही महिन्यांत कोरियन इंडस्ट्रीतील दोन गायकांचंही निधन झालं. एप्रिल महिन्यात के-पॉप बँड अॅस्ट्रोचा सदस्य मूनबिनच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. राहत्या घरी तो मृतावस्थेत आढळला होता.

पायऱ्यांवरून घसरून प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; अवघ्या 29 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Park Soo Ryun
Image Credit source: Twitter
Follow us on

सेऊल : ‘स्नोड्रॉप’ या वेब सीरिजमध्ये भूमिका साकारलेली कोरियन अभिनेत्री पार्क सू रयुनचा पायऱ्यांवरून घसरून पडल्यामुळे मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. सू रयुनच्या पार्थिवावर आज (सोमवार) अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. पायऱ्यांवरून पडल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पार्क सू रयुनच्या निधनानंतर तिच्या कुटुंबीयांना अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तिचे अवयव दान करण्याचा निर्णय तिच्या आईवडिलांनी घेतला आहे.

“तिचा फक्त मेंदू निकामी झाला होता. पण तिचं हृदय अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. अशी एखादी तरी व्यक्ती असेल ज्याला अवयवाची नितांत गरज असेल. तिचे आई-वडील म्हणून आम्ही या भावनेनं पुढील आयुष्य व्यतीत करू शकू की तिचं हृदय कोणाकडे तरी सुरक्षित आहे आणि ते धडधडतंय”, अशा शब्दांत सू रयुनच्या आईने भावना व्यक्त केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

पार्क सू रयुनने 2018 मध्ये कोरियन म्युझिक इंडस्ट्रीत पदार्पण केलं. फाईंडिंग किम जोंग वुक, पासिंग थ्रू लव्ह, सिद्धार्था, द डे वी लव्ड यांसारख्या अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये ती झळकली. ‘स्नोड्रॉप’ या वेब सीरिजमध्ये काम केल्यानंतर तिने सहकलाकारांसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यातील एका फोटोमध्ये प्रसिद्ध कोरियन अभिनेता जंग हेईनसुद्धा पहायला मिळत आहे. सू रयुनचा जन्म 1994 मध्ये झाला असून ती के-पॉप आणि के-ड्रामासमध्ये लोकप्रिय होती. ज्यादिवशी ती पायऱ्यांवरून पडली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी ती जेजू आयलँड याठिकाणी परफॉर्म करणार होती.

गेल्या काही महिन्यांत कोरियन इंडस्ट्रीतील दोन गायकांचंही निधन झालं. एप्रिल महिन्यात के-पॉप बँड ॲस्ट्रोचा सदस्य मूनबिनच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. राहत्या घरी तो मृतावस्थेत आढळला होता. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी त्याने या जगाचा निरोप घेतला होता. मे महिन्यात गायिका हासूच्या निधनाचं वृत्त समोर आलं होतं. हासूसुद्धा तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली होती.