कृष्ण कधीच अधर्म, अन्यय.., नागा चैतन्यच्या दुसऱ्या पत्नीच्या लूकवर भडकले ट्रोलर्स, फोटो व्हायरल
Sobhita Dhulipala: कृष्ण कधीच अधर्म, अन्यय.., नागा चैतन्य याच्या होणाऱ्या दुसऱ्या पत्नीवर अनेकांचा संताप, 'त्या' फोटोमुळे अभिनेत्री होतेय ट्रोल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शोभिता हिच्या फोटोची चर्चा...
दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री शोभिता धुलिपाला कायम तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. 8 ऑगस्ट 2024 मध्ये शोभिता हिने अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबत साखरपुडा केला. ज्यामुळे अनेकांनी शोभिता हिला ट्रोल केलं. आता पुन्हा शोभिता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
शोभिता हिने जन्माष्टमीच्या निमित्ताने स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. त्या फोटोमुळे अभिनेत्री ट्रोल होत आहे. जन्माष्टमी असल्यामुळे शोभिता हिने कृष्णाच्या रुपात स्वतःचा फोटो पोस्ट केला आहे. पण अनेकांना अभिनेत्रीचा फोटो आवडलेला नाही. ज्यामुळे शोभिता हिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. सांगायचं झालं तर, नागा चैतन्य याच्यासोबत साखरपुडा केल्यामुळे अभिनेत्रीवर अनेकांनी निशाणा देखील साधला आहे.
View this post on Instagram
शोभिता हिच्या फोटोवर ट्रोलर्स कमेंट करत संताप व्यक्त करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘कृष्ण अधर्म आणि अन्याय करत नाही…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तू राधा आहेक की रुक्मिणी??’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शोभिता हिच्या फोटोची चर्चा रंगली आहे.
शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांचं लग्न
शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांनी 8 ऑगस्ट 2024 रोजी कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा केला. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. अनेकांनी शोभिता – नागा चैतन्य यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तर, अनेकांनी दोघांवर निशाणा साधला.
सांगायचं झालं तर, अभिनेत्री समंथा रथ प्रभू हिला घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्य याने शोभिता हिच्यासोबत साखरपुडा केला. त्यामुळे समंथा हिच्या चाहत्यांनी अभिनेत्यावर निशाणा साधला. शोभिता – नागा चैतन्य यांचा साखरपुडा झाला आहे, पण लग्नाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.