नागा चैतन्यसोबत साखरपुडा, शोभितावर घर तोडल्याचे आरोप, ‘लग्न करुन तू कधीच आनंदी…’

Sobhita Dhulipala Trolled: 'कर्माची फळं फेडावीच लागतात...', समंथा रुथ प्रभू सोबत घटस्फोट, नागा चैतन्य दुसरा संसार थाटण्याच्या तयारीत...शोभितावर घर तोडल्याचे आरोप, 'लग्न करुन तू कधीच खुश...', सध्या सर्वत्र नागा चैतन्य - शोभिती यांच्या नात्याची चर्चा...

नागा चैतन्यसोबत साखरपुडा, शोभितावर घर तोडल्याचे आरोप, 'लग्न करुन तू कधीच आनंदी...'
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 12:17 PM

Sobhita Dhulipala Trolled: दाक्षिणात्या सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नागा चैतन्य याने अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिच्यासोबत लग्न केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघे एकमेकांना डेट करत होते. पण डेटिंग लाईफबद्दलची दोघांनी कधीच अधिकृत घोषणा केली नाही. नुकताच, साखरपुडा करत नागा चैतन्य आणि शोभिता यांनी नात्याचा सर्वांसमोर स्वीकार केला आहे. सोशल मीडियावर सध्या नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या साखपुड्याचे फोटो व्हायरल होत आहे.

अनेकांनी नागा चैतन्य आणि शोभिता यांची जोडी आवडली आहे. तर अनेकांनी मात्र शोभिता हिला ट्रोल करत अभिनेत्रीवर घर तोडण्याचे आरोप लावले आहेत. सांगायचं झालं तर, नागा चैतन्य याचे पहिलं लग्न अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्यासोबत झालं होतं. 2017 मध्ये नागा चैतन्य आणि समंथा यांनी मोठ्या थाटात लग्न केलं.

नागा चैतन्य आणि समंथा यांच्या लग्नाची देखील तुफान चर्चा रंगली. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2021 मध्ये नागा चैतन्य आणि समंथा यांनी घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोटाच्या काही दिवसांनंतर नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला.

आता साखरपुडा झाल्यानंतर नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या नात्याच्या चर्चा सत्य होत्या… असं समजत आहे. साखरपुड्यानंतर शोभिता हिला समंथाच्या चाहत्यांनी ट्रोल केलं आहे. नेटकरी शोभिता हिच्या जुन्या सोशल मीडिया पोस्ट कमेंट करत संताप व्यक्त करत आहेत.

एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘मी एक प्रार्थना करतो की तुम्हाला देखील एक मुलगी व्हायला हवी आणि तिच्या आयुष्यात समंथा सारखे दुःख यायला हवेत…’, दुसरी नेटकरी म्हणाला, ‘अत्यंत दुर्दैव आहे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं आयुष्य आणि वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त करते…’

तिसरा नेटकरी म्हणाला, ‘तुला तुझ्या कर्माची फळं नक्की मिळतील… तू तुझ्या वैवाहिक आयुष्यात कधीच आनंदी राहाणार नाहीस…’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘मी कधीच विचार केला नव्हता की, शोभिता घर तोडणारी निघेल…’ सध्या सर्वत्र शोभिता आणि नागा चैतन्य यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांनी 8 ऑगस्ट रोजी हैदराबाद याठिकाणी साखरपुडा केला. अभिनेत्याचे वडील नागार्जुन यांनी मुलगा आणि होणाऱ्या सूनेचे फोटो पोस्ट करत दोघांना शुभेच्छा दिल्या…

Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.