अर्जुन कपूरसाठी नवऱ्याला दिला घटस्फोट, अभिनेता ‘या’ सोशल मीडिया स्टारच्या प्रेमात?
Arjun Kapoor Love Life: मलायका अरोरासोबत ब्रेकअप, 'या' सोशल मीडिया स्टारसोबत अर्जुन कपूरच्या अफेअरच्या चर्चा, अर्जुनसाठी नवऱ्याला घटस्फोट देणारी 'ती' कोण?, अर्जुन कपूर कायम असतो खासगी आयुष्यामुळे चर्चेत...
अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. अभिनेता मलायका अरोरा हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे अर्जुन कपूर कायम चर्चेत असतो. पण गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जन यांचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर येत आहे. एवढंच नाही तर, कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्जुनवर असलेलं प्रेम व्यक्त करणाऱ्या मलायकाने अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या नव्हत्या. त्यामुळे अर्जुन आणि मलायका यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अर्जुन कपूर याच्या नावाची चर्चा सोशल मीडिया स्टार कुशा कपिला हिच्यासोबत देखील रंगली होती. कुशा कपिला सोशल मीडिया स्टार म्हणून प्रसिद्ध आहे. पण आता तिने अभिनेत्री म्हणून देखील स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
View this post on Instagram
कुशा तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. कुशा, अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करतेय अशा चर्चांनी देखील जोर धरला होता. अनेक रिपोर्टमध्ये असा देखील दावा करण्यात आला होता की, कुशा हिने अर्जुन याच्यासाठी पती झोरावर याला घटस्फोट दिला. यावर काही दिवसांपूर्वी खुद्द कुशा कपिला हिने प्रतिक्रिया दिली होती.
एका मुलाखतीत कुशा कपिला हिला ‘अर्जुन कपूर याला कोणाता हॅशटॅग देशील?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर कुशा हसू लागली आणि तिने मान फिरवली… अर्जुन कपूर याच्यासाठी कुशा कपिलाचं उत्तर आणि प्रतिक्रिया तुफान व्हायरल झाली होती. सांगायचं झालं तर, कुशा कपिला – अर्जुन कपूर यांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.
View this post on Instagram
मुलाखतीत कुशाला अर्जुनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर प्रश्न विचारला असता ती म्हणाली, “त्यावर उत्तर देऊन मला त्या चर्चांना आणखी खतपाणी द्यायचं नाहीये. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास मला असं वाटत नाही की त्यावर उत्तर देऊन मी त्याला आणखी महत्त्व द्यावं.” असं देखील कुशा म्हणाली होती.
अर्जुन कपूर – मलायका अरोरा
अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अर्जुन याची एन्ट्री झाली. 2017 मध्ये अरबाज – मलायकाचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2019 मध्ये मलायकाने अर्जुन सोबत असलेल्या नात्याची कबुली दिली.