‘सिद्धार्थ शुक्ला याचा दुसरा जन्म…’ ‘त्याला’ पाहून शहनाज गिल देखील होईल हैराण
Sidharth Shukla : तीच बॉडी, तीच स्माईल..., व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारा 'तो' तरुण नक्की आहे तरी कोण? शहनाज हिला देखील बसणार नाही विश्वास...., सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सिद्धार्थ याच्याप्रमाणे दिसणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल
मुंबई | 13 नोव्हेंबर 2023 : अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनाला जवळपास दोन वर्ष उलटली आहेत. तरी देखील अभिनेत्याला चाहते विसरु शकलेले नाहीत. सोशल मीडियावर कायम सिद्धार्थ शुक्ला याचे जुने व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. सिद्धार्थ याने अनेक मालिका, सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘बिग बॉस 13’ मध्ये देखील फक्त आणि फक्त सिद्धार्थ याची चर्चा होती. ‘बिग बॉस’च्या घरातच सिद्धार्थ आणि अभिनेत्री शहनाज गिल यांच्यामध्ये प्रेम बहरलं. पण दोघांची साथ शेवटपर्यंत टिकली नाही. सिद्धार्थ याने 2021 मध्ये अखेरचा श्वास घेतला आणि चाहत्यांसह शहनाज गिल हिला देखील मोठा धक्का बसला..
आजही कोणत्याही महत्त्वाच्या ठिकाणी किंवा कार्यक्रमात सिद्धार्थ शुक्ला याच्या आठवणी ताज्या होतात. पण सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारा तरुण हुबेहूब सिद्धार्थ शुक्ला याच्यासारखा दिसत आहे.. असं चाहत्यांचं म्हणणं आहे. व्हिडीओ पाहून शहनाज देखील हैराण होईल.
View this post on Instagram
सिद्धार्थ शुल्का याच्याप्रमाणे चेहरा, तीच बॉडी… तीच स्माईल… एवढंच नाही तर, सिद्धार्थ शुक्ला प्रमाणे बोलण्याची स्टाईल. तरुणाचा व्हिडीओ पाहून तुमचा देखील विश्वास बसणार नाही. व्हिडीओ पाहून अनेक चाहत्यांना सिद्धार्थ शुक्ला याची आठवण आली. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सिद्धार्थ शुक्ला याच्यासारख्या दिसणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये दिसणारा तरुण कोण?
व्हायरल होणारा व्हिडीओ चंदन नावाच्या एका तरुणाचा आहे, जो सिद्धार्थ शुक्लासारखा दिसतोय. चंदनचे दिसणे अगदी सिद्धार्थ शुक्लासारखेच आहे. चाहत्यांना चंदनमध्ये सिदची संपूर्ण झलक दिसते. या व्हिडिओमध्येही सिद्धार्थ शुक्लासारखा दिसणाऱ्या चंदनने अभिनेत्याची पूर्णपणे कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे.
सिद्धार्थ – शहनााज
सिद्धार्थ आणि शहनाज यांचं कपल चाहत्यांना देखील प्रचंड आवडत होतं. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर देखील शहनाज – सिद्धार्थ कायम एकत्र दिसायचे. एवढंच नाही तर, दोघांनी सर्वांसमोर प्रेमाची कबुली देखील दिली होती. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनामुळे चाहत्यांसह शहनाज आणि कुटुंबियांना देखील मोठा धक्का बसला.
सिद्धार्थ याच्या निधनानंतर कित्येक दिवस शहनाज माध्यम आणि सोशल मीडियापासून दूर होती. पण आता शहनाज हिने स्वतःला सावरलं आहे. दरम्यान, ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या प्रमोशनवेळी शहनाज हिने सिद्धार्थ याच्याबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या.