Soha Ali Khan: ‘बगैर वालिद के जिंदगी..’, सोहाचे वडील मंसूर अली खान यांचा कधीही न पाहिलेला व्हिडीओ
वडील मंसूर अली खान यांच्या स्मृतिदिनी सोहाने शेअर केला खास व्हिडीओ
प्रसिद्ध क्रिकेटर मंसूर अली खान पतौडी (Mansoor Ali Khan Pataudi) हे त्यांच्या काळात खूप प्रसिद्ध क्रिकेटर होते. सोहा अली खान (Soha Ali Khan) आणि सैफ अली खान ही मंसूर यांची मुलं फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. मंसूर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांची मुलगी सोहाने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. मंसूर अली खान यांचा हा कधीही न पाहिलेला व्हिडीओ आहे. ज्यामध्ये ते त्यांच्या वडिलांबद्दल बोलताना दिसत आहेत.
वयाच्या 21 व्या वर्षी झाले कर्णधार
सोहा अली खानने तिचे दिवंगत वडील मंसूर अली खान पतौडी यांच्या आठवणीत हा व्हिडीओ पोस्ट केला. मंसूर हे टायगर म्हणूनही ओळखले जायचे. फुफ्फुसाच्या संसर्गाशी झुंज दिल्यानंतर 22 सप्टेंबर 2011 रोजी वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होते. मंसूर अली खान यांची वयाच्या 21 व्या वर्षी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
मंसूर अली खान यांचा हा व्हिडिओ
त्यांच्या 11 व्या पुण्यतिथीनिमित्त सोहाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर वडिलांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये मंसूर हे उर्दूमध्ये बोलताना पहायला मिळत आहेत. “माझ्या आईने येऊन मला सांगितलं की माझे वडील नाहीत. मी त्यावेळी खूप लहान होतो आणि मला त्याचा अर्थ काय आहे हेदेखील माहित नव्हतं. कालांतराने मला समजलं की माझ्या वडिलांशिवाय माझं जीवन जगणं सोपं नाही.” सोहाने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘मला त्या आवाजाची खूप आठवण येतेय.’
View this post on Instagram
मंसूर अली खान पतौडी यांनी 1966 मध्ये शर्मिला टागोरशी लग्न केलं. त्यांना सैफ अली खान, सबा अली खान आणि सोहा अली खान ही तीन मुले आहेत. त्यापैकी सोहा आणि सैफ हे दोघंच चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. सोहाची नुकतीच ‘हश हश’ ही वेब सीरिज प्राइम व्हिडिओवर रिलीज झाली. यामध्ये तिच्यासोबतच जुही चावला, आयशा जुल्का, कृतिका कामरा, शहाना गोस्वामी आणि करिश्मा तन्ना यांच्याही भूमिका आहेत.