Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नात्यातील उत्साह संपला की..; अरबाज-सोहैलने मांडली व्यथा

अरबाज खान आणि सोहैल खान या दोन्ही भावंडांनी त्यांच्या आयुष्यात घटस्फोटाचा अनुभव घेतला आहे. अरहान खानच्या पॉडकास्टमध्ये हे दोघं रिलेशनशिप, ब्रेकअप आणि घटस्फोट यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाले.

नात्यातील उत्साह संपला की..; अरबाज-सोहैलने मांडली व्यथा
Sohail Khan with Seema Sajdeh and Arbaaj Khan with Malaika AroraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 12, 2024 | 1:44 PM

अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खान याने पॉडकास्टर म्हणून करिअरची सुरुवात केली आहे. ‘डंब बिर्याणी’ हा त्याचा पॉडकास्ट युट्यूबवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या पॉडकास्टमध्ये अरबाज खान आणि सोहैल खान हे विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाले. पॉडकास्टच्या पहिल्याच एपिसोडमध्ये अरहानचे वडील अरबाज आणि काका सोहैल यांनी हजेरी लावली होती. यावेळी दोघं रोमँटिक रिलेशनशिप्समधील यश आणि अपयशाबद्दल बोलताना दिसले. अरबाज आणि सोहैल या दोघांचाही घटस्फोट झाला आहे. अरबाजने नुकतंच दुसरं लग्न केलंय, तर सोहैल सध्या सिंगलच आहे. काही नाती यशस्वी का ठरत नाही, याविषयी ते पॉडकास्टमध्ये व्यक्त झाले.

जेव्हा तुम्ही तुमच्या नात्यातील उत्साह गमावता, तेव्हा त्यातून एकमेकांच्या संमतीने पुढे जाणं खूप गरजेचं असतं, असं सोहैल म्हणाला. तर कोणतंही नातं फक्त एका व्यक्तीभोवती नियंत्रित नसतं, यावर अरबाजने भर दिला. त्याचप्रमाणे प्रत्येक नात्याची एक ‘एक्स्पायरी डेट’ (संपुष्टात येण्याची तारीक) असतेच, असं मत सोहैलने मांडलं.

“आपण रिलेशनशिपमध्ये असताना एकमेकांवर खूप दबाव टाकतो. त्या व्यक्तीचं काय होणार, आपलं काय होणार याचा ताण घेतो. पण यापलीकडेही जग असतं. जोपर्यंत नातं टिकवता येईल, जोपर्यंत तुम्ही एकत्र आनंदी राहाल, तोपर्यंत ते नातं जपून ठेवा. त्यात कटुता आणू नका. कारण तेव्हा समोरच्या व्यक्तीबद्दल मनात नकारात्मक भावना निर्माण होऊ लागते. प्रत्येक गोष्टीची एक्स्पायरी असते. औषध असो, चॉकलेट असो, खाद्यपदार्थ असो.. प्रत्येक गोष्टीची एक्स्पायरी असते. जेव्हा तुम्ही नात्यातला उत्साह गमावता, तेव्हा एकमेकांच्या संमतीने त्यातून बाहेर पडायला हवं. यासाठी संवाद खूप महत्त्वाचा असतो”, असं सोहैल म्हणाला.

हे सुद्धा वाचा

नात्यांविषयी बोलताना अरबाज म्हणाला, “एखाद्या रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी सर्वांत महत्त्वाची वेळ म्हणजे जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीकडून सतत काहीतरी घेण्यापेक्षा त्याला काहीतरी द्यायला तयार असता. पार्टनरकडून काहीतरी मिळेल याच अपेक्षेने अनेक नात्यांची सुरुवात होते. पण ते स्वत: पार्टनरला काय देऊ शकतात, हेच त्यांना माहीत नसतं. नात्यात समोरच्या व्यक्तीला काहीतरी देण्याच्या उद्देशानेच या. याशिवाय दुसरं कोणतं कारणच असू शकत नाही. जर तुम्ही फक्त फायदा घेतच राहिलात, तर समोरची व्यक्ती त्या रिलेशनशिपमध्ये फार काळ राहू शकणार नाही. आनंदासाठी एखाद्या व्यक्तीने त्याच्या पार्टनरवर अवलंबून राहू नये. परंतु जर एखाद्या नातेसंबंधात फसवणूक होऊ लागली, तर ते संपवण्यातच सगळ्यांचं भलं असतं.” नात्यात कमिटमेंटही तितकीच महत्त्वाची असते, यावरही अरबाजने भर दिला.

“जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मित्रासारखा किंवा मैत्रिणीसारखा संवाद साधू शकलात, तर ते नातं जास्त काळ टिकण्याची शक्यता असते. त्याला किंवा तिला एखादी गोष्टी मी यासाठी सांगू शकत नाही, कारण ती किंवा तो त्यावरून माझ्याबद्दल मत बनवेल, अशी भीती वाटत असेल तर तीच खरी समस्या आहे”, असंही अरबाजने सांगितलं.

सोहैल खानने 1998 मध्ये सीमा सजदेहशी लग्न केलं होतं. लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर 2022 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. या दोघांना निर्वाण आणि योहान ही दोन मुलं आहेत. तर दुसरीकडे अरबाज खानने 1998 मध्ये अभिनेत्री मलायका अरोराशी लग्न केलं होतं. हे दोघं 2017 मध्ये विभक्त झाले. अरबाजने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसऱ्यांदा निकाह केला.

'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर
'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर.
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल.
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?.
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर...
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर....
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?.
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट.
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण...
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण....
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्.
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल.
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी.