घटस्फोट फक्त कागदाचा तुकडा, आम्ही बऱ्याच वर्षांपूर्वी.. सोहैल खानच्या पूर्व पत्नीने सांगितलं कारण

2022 मध्ये सीमा आणि सोहैल यांनी घटस्फोट घेतला. लग्नाच्या 24 वर्षांनंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांना निर्वाण आणि योहान ही दोन मुलं आहेत. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही दोघं वेगळे राहतोय, असं तिने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

घटस्फोट फक्त कागदाचा तुकडा, आम्ही बऱ्याच वर्षांपूर्वी.. सोहैल खानच्या पूर्व पत्नीने सांगितलं कारण
Sohail Khan and Seema SajdehImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 5:00 PM

मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता सोहैल खानचं खासगी आयुष्य गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या वर्षी सोहैलने पत्नी सीमा सजदेहला घटस्फोट दिला. लग्नाच्या 24 वर्षांनंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांना दोन मुलं आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सीमा तिच्या आयुष्यातील या कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. पॉडकास्ट मुलाखतीत सीमाला विचारण्यात आलं की घटस्फोटामुळे तुला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला? त्यावर ती म्हणाली की, “घटस्फोटानंतर मी माझ्याबद्दल अनेक द्वेषपूर्ण कमेंट्स वाचले आहेत. काहींनी असंही म्हटलं की मी माझ्या फायद्यासाठी खान कुटुंबाचा वापर केला आणि काम पूर्ण झाल्यानंतर सोहैलला सोडून दिलं.”

याविषयी सीना पुढे म्हणाली, “माझ्या वडिलांची अशी मानसिकता होती की आता माझ्या मुलीची काळजी कोण घेणार? आपल्या भारतीय संस्कृतीत घटस्फोटाला एक कलंकच मानलं जातं. आजच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक कमेंट्स वाचायला मिळतात. मी माझ्या फायद्यासाठी सोहैलचा वापर केला, असं लोक म्हणाले. हे सर्व वाचून मला आश्चर्याचा धक्काच बसला.” घटस्फोटाच्या बऱ्याच आधीपासून सोहैलसोबत राहत नसल्याचंही सीमाने स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

“घटस्फोटाच्या निर्णयासाठी मी त्याला का दोष देऊ? हा आम्हा दोघांचा निर्णय होता. आमचा मुलगा निर्वाण त्यावेळी अशा वयात होता, जेव्हा त्याला हे घडू नये असं वाटलं होतं. पण एक वेळ अशी आली होती की मला माझं लग्न किंवा माझा मुलगा या दोघांपैकी एकाचीच निवड करायची होती. माझा मुलगा अशा मार्गावर जात होता, ज्याची मला खूप भीती होती. एके दिवशी मी सकाळी उठले तेव्हा जाणवलं की मी माझी सर्व ऊर्जा या लग्नाला वाचवण्यासाठी घालवतेय आणि मुलाकडे दुर्लक्ष करतेय. तेव्हा मी माझा निर्णय घेतला आणि विभक्त झाले”, असं सीमा म्हणाली.

सोहैल आणि सीमाचा घटस्फोट तिसऱ्या महिलेमुळे झाल्याची चर्चा होती. मात्र असं काहीच नसल्याचं सीमाने स्पष्ट केलं. “यात काहीच सत्य नाही. मी माझ्या मुलांच्या भवितव्यासाठी हा निर्णय घेतला. घटस्फोटाचा निर्णय माझा होता. सतत होणाऱ्या भांडणांमुळे मी खुश नव्हते. त्याचा मुलांवरही वाईट परिणाम होत होता. घटस्फोट तर फक्त कागदाचा एक तुकडा आहे. पण आम्ही बऱ्याच वर्षांपासून वेगळे राहत होतो. माझ्या मुलाने जेव्हा मला सांगितलं की मी ठीक आहे, तू पुढे जाऊ शकतेस. तेव्हा मी घटस्फोटावर शिक्कामोर्तब केला”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.