रस्त्यावर पडलेल्या महिलेसोबत सोहेल खान याने काय केलं? ज्यामुळे होतय अभिनेत्याचं कौतुक
'दयाळू व्यक्ती...', सोहेल खान रस्त्यावर पडलेल्या अनोळखी महिलेसाठी आला धावून; ज्यामुळे होतय अभिनेत्याचं कौतुक, व्हायरल व्हिडीओमुळे अभिनेता सर्वत्र चर्चेत
मुंबई : अभिनेता आणि फिल्ममेकर सोहेल खान कायम मुंबई याठिकाणी फिरताना दिसतो. कायम आपल्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असणारा सोहेल आता एका महिलेच्या मदतीसाठी धावून आला आहे. रस्त्यावर पडलेल्या महिलेच्या मदतीसाठी सोहेल धावत आला. सोहेल याने इतर लोकांच्या मदतीने महिलेची मदत केली. सध्या अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक चाहते अभिनेत्याचं कौतुक करत आहेत. सध्या सर्वत्र सोहेलमध्ये असलेल्या माणुसकीची चर्चा रंगत आहे.
व्हिडीओमध्ये टि-शर्टवर दिसणारा अभिनेता सोहेल खान महिलेच्या मदतीसाठी धावून आला. व्हिडीओमध्ये सोहेल इतर व्यक्तींसोबत महिलेला उचलताना दिसत आहे. तेव्हा महिला म्हणते, ‘कसं उचलणार? माझा पाय तर…’ महिला असं म्हणाल्यानंतर अभिनेता इतरांच्या मदतीने तिची मदत करतो.
View this post on Instagram
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र अभिनेत्याचं कौतुक होत आहे. एका चाहत्यांने कमेंटमध्ये लिहिलं की, ‘सोहेल प्रचंड दयालू आहे.’, तर आणखी एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘गोल्डन हार्ट सोहोल बॉस’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सोहेल खान याने सलमान आणि संजय कपूर स्टारर ‘औजार’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर सोहेल याने ‘प्यार किया तो डरना क्या’ (1998) आणि ‘हॅलो ब्रदर’ (1999) यांसारख्या हीट सिनेमांमध्ये काम केलं. ‘मैंने दिल तुझको दिया’ सिनेमात अभिनेत्याने मुख्य भूमिका साकारली.
‘मैंने दिल तुझको दिया’ सिनेमानंतर सोहेल ‘डरना मना है’, ‘कृष्णा कॉटेज’, ‘आर्यन’, ‘सलाम-ए-इश्क: ए ट्रिब्यूट टू लव’ आणि ‘हॅलो’ सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली. त्यानंतर २०१७ साली सोहेल अभिनेता सलमान खान स्टारर ‘ट्यूबलाइट’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आला.
सोहेल खान स्क्रिन रायटर सलीम खान आणि सलमा खान यांचे पूत्र आहेत. तर सलमान खान आणि अरबाज खान यांचा लहान भाऊ आहे. त्यांना दोन बहिणी देखील आहेत. खान कुटुंबातील मुलींची नावं अलविरा अग्निहोत्री आणि अर्पिता खान असं आहे.