वडिलांच्या निधनानंतर तुटली मलायका अरोरा, ते फोटो व्हायरल, अर्जुन कपूर याने…

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळल्याचे बघायला मिळतंय. अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन झाले. मलायका अरोरा हिच्या वडिलांचे निधन झाल्याचे कळताच अर्जुन कपूर हा घटनास्थळी पोहोचली. यावेळी मलायका सांभाळतानाही अर्जुन दिसला.

वडिलांच्या निधनानंतर तुटली मलायका अरोरा, ते फोटो व्हायरल, अर्जुन कपूर याने...
malaika arora
Follow us
| Updated on: Sep 12, 2024 | 1:07 PM

मलायका अरोरा हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मलायका अरोरा हिचे वडील अनिल मेहता यांनी बांद्रा येथील राहत्या घराच्या बाल्कनीतून उडी घेत आत्महत्या केली. मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या केल्याने मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. अनेक कलाकार हे मलायकाच्या आई वडिलांच्या घरी पोहोचले. हेच नाही तर अरबाज खान हा वडील सलीम खान यांना घेऊन मलायकाच्या घरी पोहोचला. ज्यावेळी मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या केली, त्यावेळी मलायका अरोरा हिची आई एकटी घरी होती. पोलिस या प्रकरणात सध्या तपास करत आहेत.

वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोरा हिला चांगलाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. मलायका ही अनेक व्हिडीओमध्ये थेट रडताना देखील दिसली. करीना कपूर, करिश्मा कपूर या वाईट काळात मलायका अरोरा हिच्यासोबत उभ्या दिसल्या. हेच नाही तर अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीये.

दुसरीकडे मलायका अरोरा हिच्या वडिलांच्या निधनाची बातमी कळताच अभिनेता अर्जुन कपूर हा देखील घटनास्थळी धावत आल्याचे बघायला मिळाले. अर्जुन कपूर हा सकाळपासून ते रात्रीपर्यंत मलायका हिच्यासोबतच दिसला. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्या व्हिडीओमध्ये मलायकाच्यासोबत घराच्या बाहेर पडताना अर्जुन दिसतोय.

अर्जुन कपूर हा मलायका अरोरा हिच्या दु:खाच्या काळात तिच्यासोबत उभ्या असल्याचे दिसत आहे. मलायका अरोरा हिच्या वडिलांनी नेमकी आत्महत्या का केली याबद्दल अजून खुलासा हा होऊ शकला नाही. आत्महत्या करण्याच्या काही वेळ अगोदर नेमके काय घडले, याबद्दल देखील सांगण्यात आले. सकाळी नऊ वाजता मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केली.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सातत्याने रंगताना दिसली. काही दिवसांपूर्वीच सतत मलायका ही विदेशात जाताना दिसत होती. हेच नाही तर अर्जुन कपूर याने काही पोस्टही सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या, ज्यानंतर यांच्या ब्रेकअपची चर्चा झाली. मात्र, आता वाईट काळात मलायका अरोरा हिच्यासोबत अर्जुन कपूर हा दिसतोय.

Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.