आलियाच्या नव्या चित्रपटाच्या अडचणीत वाढ, गंगुबाई काठियावाडी यांच्या मुलाकडूनच कोर्टात याचिका, कारण…

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

आलियाच्या नव्या चित्रपटाच्या अडचणीत वाढ, गंगुबाई काठियावाडी यांच्या मुलाकडूनच कोर्टात याचिका, कारण...
प्रदर्शनाच्या वाटेवर पुन्हा अडथळा, ‘गंगूबाई..’ विरोधात कामाठीपुरा रहिवाशांची मनसेकडे धाव!
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 10:06 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात गंगुबाई काठियावाड यांच्या कुटुंबाची बदनामी होत असल्याचा आरोप करत मुंबईतील माझगाव न्यायालयात याचिका दाखल झालीय. या प्रकरणी न्यायालयाने आलिया भट, संजय लीला भंसाळी आणि लेखकाला समन्स बजावण्यात आलंय. त्यामुळे ते तिघे या समन्सला काय उत्तर देतात आणि त्यावर न्यायालय काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे (Son of Gangubai Kathiawadi file petition against Movie of Alia Bhatt).

गंगूबाई काठियावाडी चित्रपट अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्येच वादात सापडल्याने चित्रपट निर्मात्यांच्या अडचणीत वाढ झालीय. न्यायालयाने या सर्वांना 21 मे रोजी कोर्टात हजर होण्यास सांगितलं आहे. याचिकाकर्त्याने आरोप लावला आहे, “गंगुबाई काठियावडी या चित्रपटात चुकीच्या गोष्टी दाखवण्यात आल्यात. त्यामुळे गंगूबाई यांच्या कुटुंबाची बदनामी होत आहे. या चित्रपटात दाखवलेल्या गोष्टी खऱ्या नसून खोट्या बाबींवर चित्रपट आधारलेला आहे.”

रहिवाशांची मनसेकडे धाव

यासंदर्भात कामाठीपुरा रहिवाशांनी मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांची आज (5 मार्च) भेट घेतली. त्यामुळे मनसे आता या प्रकरणात मध्यस्थी करणार आहे. चित्रपटाचे निर्माते संजय लीला भन्साळी यांच्याकडे यांच्याशी लवकरच संवाद साधून रहिवाशांची बाजू मांडणार असल्याचे, मनसेच्यावतीने सांगण्यात आले आहे. ‘कामाठीपुरा’ हा उल्लेख संपूर्ण चित्रपटातून वगळावा, अशी मागणी मनसे चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्याकडे करणार आहे. बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे.

भन्साळींच्या ‘गंगूबाई..’मागे वादांचा ससेमिरा…

‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटावर आक्षेप घेण्याची ही पहिली वेळ नाही. या आधी खुद्द गंगूबाई यांच्या मुलाने देखील या चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला होता. गंगूबाई यांचे पुत्र बाबूजी रावजी शाह यांनी आलिया भट्ट, संजय लीला भन्साळी आणि प्रख्यात लेखक हुसेन जैदी यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. या सर्वांवर यापूर्वी देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रख्यात लेखक हुसेन जैदी यांनी ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात गंगूबाईंचा उल्लेखही करण्यात आला आहे. याचा पुस्तकावर हा चित्रपट तयार केला जात आहे.

का पाठवली कायदेशीर नोटीस?

‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकाच्या धर्तीवर संजय लीला भन्साळी यांना गंगूबाई काठियावाडी यांचे जीवन आणि त्यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर दाखवायचा होता. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, गंगूबाईच्या मुलाने असे म्हटले आहे की, हुसेन जैदीच्या पुस्तकाचे काही भाग त्यांचे वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणणारे असून, यामुळे कुटुंबाची बदनामी होऊ शकते. त्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण त्वरित थांबवावे आणि पुस्तकातील काही आक्षेपार्ह भाग चित्रपटाच्या कथेतून वगळावेत, अशी त्यांची इच्छा आहे (Gangubai Kathiawadi controversy Mumbai kamathipura residents meet MNS leader Ameya Khapokar).

बाबूजी रावजी शाह म्हणाले की, जेव्हापासून चित्रपटाची घोषणा झाली आहे, तेव्हापासून स्थानिक लोकांकडून त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय एका वाईट कुटुंबातील म्हणून त्यांना हिणवले जात आहे. तसेच यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, या मानसिक त्रासामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना गंभीर दुखापत झाल्याचा खुलासाही त्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

हेही वाचा :

Gangubai Kathiawadi | प्रदर्शनाच्या वाटेवर पुन्हा अडथळा, ‘गंगूबाई..’ विरोधात कामाठीपुरा रहिवाशांची मनसेकडे धाव!

गंगूबाईचा रोल आलियाच्या नशिबी नव्हता, भन्साळींची पहिली पसंती होती ‘या’ हिरॉईनला

Gangubai Kathiawadi Teaser : संजय भन्सालींच्या वाढदिवसाचे मोठे सरप्राईज, पाहा ‘गंगूबाई काठियावाडी’चा जबरदस्त टीझर!

व्हिडीओ पाहा :

Son of Gangubai Kathiawadi file petition against Movie of Alia Bhatt

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...