‘सन ऑफ सरदार’ फेम सेलिब्रिटीच्या मुलाचा रस्ते अपघातात मृत्यू, अंत अत्यंत वाईट

कार डिव्हायडर आदळली आणि..., 'सन ऑफ सरदार' फेम सेलिब्रिटीच्या मुलाचा रस्ते अपघातात मृत्यू, वयाच्या 18 व्या वर्षी सेलिब्रिटी किडने घेतला अखेरचा श्वास, अंत अत्यंत वाईट... रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मृत घोषित केलं...

'सन ऑफ सरदार' फेम सेलिब्रिटीच्या मुलाचा रस्ते अपघातात मृत्यू, अंत अत्यंत  वाईट
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 7:46 AM

‘अतिथी तुम कब जाओगे’ आणि ‘सन ऑफ सरदार’ यांसारख्या सिनेमाचे दिग्दर्शक आणि लेखल अश्विनी धीर यांनी त्यांच्या 18 वर्षांच्या मुलाला गमावलं आहे. अश्विनी धीर यांच्या मुलाचं नाव जलज धीर असं होतं. निर्मात्यांच्या मुलाचं 23 नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबईत एका रस्ते अपघातात निधन झालं आहे. अपघातात जलज याच्या आणखी एका मित्राचं देखील निधन झालं आहे. रिपोर्टनुसार, जलज त्याच्या इतर तीन मित्रांसह कारमध्ये उपस्थित होता. या अपघातात त्याच्या आणखी एका मित्राला जीव गमवावा लागला. जलज धीरचा मित्र साहिल मेंधा दारूच्या नशेत होता आणि कार चालवत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, विलेपार्ले येथे 120-150 मैल प्रतितास वेगाने जाणारी कार नियंत्रणाबाहेर गेली आणि सर्व्हिस रोड आणि डिव्हायडरला धडकली या दुर्दैवी घटनेत जलज आणि त्याचा मित्र सार्थक कौशिक यांचा मृत्यू झाली आहे. वयाच्या 18 व्या वर्षी मुलाचा अपघातात निधन झाल्यानुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

माहितीनुसार, गोरेगाव पूर्वेला असलेल्या जलज धीर याच्या घरी सर्व मित्र जमले. रात्री साडेतीन वाजेपर्यंत चौघांनी व्हिडिओ गेमचा आनंद घेतला. यानंतर ते लाँग ड्राईव्हला गेले. सर्वांनी आधी वांद्रे येथील सिगडी रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं आणि त्यानंतर पहाटे 4.10 च्या सुमारास गोरेगाव पूर्वेकडे परतीचा प्रवास सुरू केला. घरी परतत असताना अपघात झाला. या अपघातात जलज आणि सार्थक यांच्या मृत्यू झाला आहे. तर साहिल आणि जिमी जखमी आहे.

जलज आणि सार्थक यांच्या मृत्यू…

अपघात झाल्यानंतर जिनी याने घटनास्थळावर उपस्थित दोन लोकांच्या मदतीने जलज याल ट्रॉमा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर कोकिलाबेन रुग्णालयात जलज याला दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात पोहोचतात जलज याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून कार चालवत असलेल्या साहील साहिल मेंधा याला ताब्यात घेतला आहे.

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....