Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे रोमांटिक फोटो व्हायरल, भांगात सिंदूर आणि…

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आलीये. सोनाक्षी सिन्हाने काही दिवसांपूर्वीच झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. सोनाक्षी सिन्हा आणि सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे रोमांटिक फोटो व्हायरल, भांगात सिंदूर आणि...
Sonakshi Sinha
Follow us
| Updated on: Jul 14, 2024 | 4:01 PM

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत 23 जून 2024 रोजी लग्न केले. या लग्नाच अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. सोनाक्षी सिन्हा हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. सोनाक्षी सिन्हा हिने सात वर्ष डेट केल्यानंतर झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाला तिच्या घरच्यांकडून विरोध असल्याचेही सांगितले जात होते.

दुसरीकडे लग्नात वडिलांचा हात धरूनच सही करताना सोनाक्षी सिन्हा ही दिसली. सोनाक्षी सिन्हा हिने वडील शत्रुघ्न सिन्हा आणि आई पूनम सिन्हा यांना त्यांच्या 44 व्या लग्नाच्या वाढदिवसाला खास गिफ्ट दिले. खास पार्टी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आली होती. मात्र, सोनाक्षी सिन्हा हिचे दोन्ही भाऊ या पार्टीला पोहोचले नाहीत. लव आणि कुश सोनाक्षी सिन्हावर लग्नानंतर नाराज आहेत.

सोनाक्षी सिन्हा हिने नुकताच इंस्टाग्राम स्टोरीवर अत्यंत खास असे फोटो शेअर केले आहेत. पती झहीर इक्बाल याच्यासोबत रोमांटिक फोटो सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर शेअर केल्याचे बघायला मिळतंय. विशेष म्हणजे अत्यंत जबरदस्त अशा लूकमध्येही सोनाक्षी सिन्हा ही दिसत आहे. चाहत्यांना सोनाक्षी सिन्हा हिचा हा लूक आवडलाय.

सोनाक्षी सिन्हा हिने भांगामध्ये सिंदूर, लाल टिकली, गोल्डन रंगाचा मोठे कानातले आणि लाल रंगाचा सुंदर असा ड्रेस घातलाय. दुसरीकडे झहीर इक्बाल याने काळ्या रंगाची शेरवानी घातल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे फोटोसाठी जबरदस्त अशा पोझ देताना दिसत आहेत. हे फोटो चाहत्यांना आवडताना देखील दिसत आहेत.

झहीर इक्बाल यानेही सोशल मीडियावर खास फोटो शेअर केलाय. हा फोटो अंबानींच्या पार्टीतील आहे. या फोटोमध्ये सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बाल, सलमान खान आणि संजय दत्त हे दिसत आहेत. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे नुकताच अनंत अंबानी याच्या शुभ आशिर्वाद सेरेमनीमध्ये पोहोचले होते. आता सोनाक्षी सिन्हा हिने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.