लग्नाच्या 3 महिन्यांनंतर सोनाक्षी सिन्हा नवऱ्याला त्रासली? म्हणाली, ‘कृपया तू घर सोडून…’
Sonakshi Sinha On Husband Zaheer Iqbal: 'कृपया तू घर सोडून...', सोनाक्षी सिन्हा लग्नाच्या 3 महिन्यांनंतर नवऱ्याबद्दल असं का म्हणाली? चर्चांना उधाण, झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री कायम असते चर्चेत...
Sonakshi Sinha On Husband Zaheer Iqbal: मुस्लीम मुलासोबत लग्न केल्यामुळे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला ट्रोल करण्यात आलं. तर अभिनेता आणि सोनाक्षीचा पती झहीर इक्बाल याच्यावर ‘लव्ह जिहाद’ सारखे आरोप करण्यात आले. पण दोघांनी कधीच होणाऱ्या ट्रोलिंगकडे लक्ष दिलं नाही. सोनाक्षी आणि झहीर यांनी फक्त त्यांच्या भावनांना अधिक महत्तव दिलं. नुकताच झालेल्या मुलाखती सोनाक्षी आणि झहीर यांनी त्यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. शिवाय दोघांच्या आवडी – निवडींबद्दल देखील सांगितलं आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत सोनाक्षी – झहीर यांना त्यांच्या चांगल्या वाईट सवयींबद्दल विचारण्यात आलं. यावर झहीर म्हणाला, ‘सोनाक्षी हिच्यामध्ये अशा फार कमी गोष्टी आहेत, ज्या मला आवडत नाही. तिच्या कोणत्याही सवयीमुळे मला त्रास होत असेल तर तो तिचा स्वार्थ आहे. तिला जज करण्याऐवजी किंवा तिच्यावर रागावण्याऐवजी ती तिच्या अहंकाराला इतकं महत्त्व का देते हे मला समजून घ्यायचे आहे?’
झहीर पुढे म्हणाला, ‘सोनाक्षी जरा जास्तच वक्तशीर आहे.. वक्तशीर असणे महत्वाचे आहे, परंतु काहीवेळा थोडा उशीर होणं देखील मान्य आहे.’ झहीरला सोनाक्षीबद्दल सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे तिची नम्रता आणि साधेपणा.’ असं झहीर म्हणाला.
सोनाक्षी हिने देखील नवऱ्याचं कौतुक केलं आणि त्याच्याबद्दल न आवडणाऱ्या गोष्टी सांगितल्या. ‘झहीर मोठ्या मनाचा व्यक्ती आहे. झहीर फक्त त्याच्या कुटुंबियांसाठी दयाळू नाही तर, आजू – बाजूच्या सर्व लोकांना सन्मान देतो.. त्याचा हाच स्वभाव मला प्रचंड आवडतो.’
एवढंच नाही तर, सोनाक्षी हिने झहीर याच्या वाईट सवयींबद्दल सांगितलं. ‘झहीर प्रचंड गोंधळ घालत असतो… सतत शीटी वाजत असतो… आवाज करत असतो… त्याच्या आवाजामुळे मी शांततेच्या शोधात असते.’ यावर झहीर म्हणतो, ‘पण ती अतिशय नम्रपणे वागते आणि म्हणते, कृपया घर सोडून जा तू…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त झहीर आणि सोनाक्षी यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचं लग्न…
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 23 जून 2024 मध्ये लग्न केलं. जवळपास 7 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी सिन्हा – झहीर इक्बाल यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.