सोनाक्षीच्या सासऱ्यांबद्दल वादग्रस्त पोस्ट लिहिल्यानंतर भावाकडून आता डॅमेज कंट्रोल

मी लग्नाला उपस्थित का राहिलो नाही याची कारणं अगदी स्पष्ट आहेत आणि काहीही झालं तरी मी काही लोकांशी कधीच संबंध ठेवणार नाही, असं ट्विट सोनाक्षी सिन्हाचा भाऊ लव सिन्हाने केलं होतं. यासोबतच त्याने बहिणीच्या सासऱ्यांबद्दल एक वादग्रस्त पोस्ट लिहिली होती.

सोनाक्षीच्या सासऱ्यांबद्दल वादग्रस्त पोस्ट लिहिल्यानंतर भावाकडून आता डॅमेज कंट्रोल
लव सिन्हा, सोनाक्षी-झहीरImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 11:47 AM

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय लग्नावरून अद्याप वाद सुरूच असल्याचं पहायला मिळतंय. लग्नाच्या सात दिवसांनंतर सोनाक्षी भाऊ लव सिन्हा याने एक्स (ट्विट) अकाऊंटवर काही वादग्रस्त पोस्ट लिहिले. ही पोस्ट सोनाक्षीच्या सासऱ्यांबद्दल होती. लव सिन्हाची ही पोस्ट व्हायरल होताच त्याने आता डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. सोनाक्षीच्या सासऱ्यांबद्दलची ती वादग्रस्त पोस्ट त्याने एक्स अकाऊंटवर डिलिट करत स्पष्टीकरण दिलं आहे. सोनाक्षीने 23 जून रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न केलं. या लग्नाबाबत तिच्या कुटुंबात नाराजी असल्याची जोरदार चर्चा होती. तिचा सख्खा भाऊ लव सिन्हा या लग्नाला गैरहजर होता. काही लोकांशी मला कधीच संबंध ठेवायचे नाहीत, असं म्हणत त्याने लग्नाला गैरहजर राहण्यामागचं कारण सांगितलं होतं.

सोनाक्षीच्या सासऱ्यांबद्दलची पोस्ट काय होती?

‘त्याच्या कौटुंबिक व्यवसायाबद्दल काळजीपूर्वक बातम्या तयार केल्या गेल्या आहेत. मुलाच्या वडिलांचं एका अशा राजकारण्याशी जवळचे संबंध आहेत, ज्याची ईडी चौकशी वॉशिंग मशीनमध्ये गायब झाली होती, याकडे कोणी लक्ष वेधत नाही. तसंच मुलाच्या वडिलांच्या दुबईतील वास्तव्याबद्दलही कोणतीच चर्चा नाही’, असं वादग्रस्त ट्विट लव सिन्हाने केलं होतं. यापुढे त्याने म्हटलं होतं, ‘मी लग्नाला उपस्थित का राहिलो नाही याची कारणं अगदी स्पष्ट आहेत आणि काहीही झालं तरी मी काही लोकांशी कधीच संबंध ठेवणार नाही. मला आनंद आहे की मीडियाच्या सदस्याने पीआर टीमद्वारे मांडलेल्या सर्जनशील कथांवर अवलंबून न राहता त्यांचा रिसर्च केला.’

हे सुद्धा वाचा

लव सिन्हाचे आधीचे ट्विट्स-

पोस्ट डिलिट करून सारवासारव

झहीरच्या वडिलांबद्दलची पोस्ट डिलिट करून लवने आता लिहिलंय, ‘माझ्या नावाने जे विधान व्हायरल केलं जातंय, ते माझं नसून एका ज्येष्ठ पत्रकाराने त्यांच्या लेखात लिहिलं होतं. हे प्रकरण आता संपलं आहे आणि त्यावर मी अधिक भाष्य करणार नाही.’ लव सिन्हाच्या या नव्या पोस्टमुळे पुन्हा एकदा सोनाक्षी-झहीरच्या लग्नावरून निर्माण झालेल्या वादाची चर्चा होऊ लागली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.