सोनाक्षी सिन्हासोबत लग्नानंतर कसं आयुष्य जगतोय झहीर? दुसऱ्या धर्माबद्दल अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
Zaheer Iqbal and Sonakshi Sinha Interfaith Marriage : सोनाक्षी सिन्हा - झहीर इक्बाल यांच्या लग्नामुळे माजली होती सर्वत्र खळबळ... अभिनेत्रीच्या नवऱ्याने अखेर दुसऱ्या लग्नाबद्दल केलं मोठं वक्तव्य..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त झहीर याच्या वक्तव्याची चर्चा...
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिंदू आणि अभिनेता झहीर मुस्लिम असल्यामुळे चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर अनेक वाद रंगले होते. शिवाय सोनाक्षीच्या लग्नामुळे कुटुबियांमध्ये देखील नाराजी असल्याची माहिती समोर आली होती. यावर खुद्द सोनाक्षी हिचे वडील आणि दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. सोनाक्षी कधीच चुकीचा निर्णय घेणार नाही… असा विश्वास शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केला होता. शिवाय दुसऱ्या धर्मात लग्न केल्यानंतर सोनाक्षी हिने देखील मौन सोडलं होतं.
मुलाखतील सोनाक्षी हिला, ‘एकमेंकांच्या संस्कृतीतील चांगल्या गोष्टींना आयुष्यात सामिल कराल?’ यावर अभिनेत्री म्हणाली, ‘नक्की… ही फार उत्तम गोष्ट आहे. खरं सांगायचं झालं तर, आम्ही दोघं एकमेकांपासून फार वेगळे नाही… आमच्यातील नैतिकता सारख्या आहे. आमच्या आई – वडिलांनी आम्हाला चांगली व्यक्ती होण्यासाठी सांगितलं आहे… आम्हाला चांगले संस्कार मिळाले आहेत…’
View this post on Instagram
यावर झहीर याने देखील मोठं वक्तव्य केलं आहे. झहीर म्हणाला, ‘माझ्या आणि सोनाक्षीमध्ये 50 गोष्टींवरून मतभेद असतील. पण आमच्यात कधीच धर्माचा मुद्दा येत नाही. सलीम खान (सलमान खान याचे वडील) यांनी मला सांगितलं होते, सलमा खान यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी देखील त्यांनी सलमा यांच्या कुटुंबियांना हेच सांगितलं होतं.’
‘आम्ही सात वर्ष एकमेकांना डेट केलं पण आमच्यात कधीच धर्म आडवा आला नाही. आम्ही एकमेकांच्या धर्माचा आदर करतो. आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतोय हेच सत्य आहे….’ असं देखील झहीर इक्बाल म्हणाला… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त झहीर याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
सोनाक्षी – झहीर यांचं लग्न
सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, वांद्रे येथील घरात सोनाक्षी – झहीर यांनी रजिस्टर्ड पद्धतीत लग्न केलं. लग्नानंतर सोनाक्षी हिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या हॉटेलमध्ये रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. रिसेप्शन पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. पार्टीचे व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.