सोनाक्षी सिन्हाचं मुस्लिम मुलासोबत लग्न, नाराज आई म्हणाली, ‘मी माझ्या आईचं ऐकलं, पण माझ्या मुलीने…’

Sonakshi Sinha Marriage: 'मी माझ्या आईचं ऐकलं, पण माझ्या मुलीने...', सोनाक्षीने मुस्लिम मुलासोबत लग्न केल्यामुळे आई नाराज... अखेर अभिनेत्रीच्या आईने व्यक्त केल्या मनातील भावना..., सोनाक्षी कायम खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत...

सोनाक्षी सिन्हाचं मुस्लिम मुलासोबत लग्न, नाराज आई म्हणाली, 'मी माझ्या आईचं ऐकलं, पण माझ्या मुलीने...'
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 11:45 AM

Sonakshi Sinha Marriage: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम यांची लेक सोनाक्षी सिन्हा हिने नुकताच लग्न केलं. सोनाक्षी हिने अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केलं. सोनाक्षी हिने मुस्लिम मुलासोबत लग्न केल्यामुळे सर्वत्र खळबळ देखील माजली होती. चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर नको त्या चर्चा देखील रंगू लागल्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे, सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नात अभिनेत्री दोन्ही भाऊ देखील नसल्याची माहिती समोर आली होती.

लेकीच्या लग्नानंतर खुद्द शत्रुघ्न सिन्हा यांनी भावना व्यक्त केल्या होत्या. आता सोनाक्षीच्या आई पूनम सिन्हा यांनी लेकीच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. नुकताच झालेल्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा सीझन 2’ मध्ये सोनाक्षी तिच्या कुटुंबासोबत आली होती. शोमध्ये पूनम यांनी लेकीच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र पूनम यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

लग्नाबद्दल पूनम सिन्हा म्हणाल्या, ‘माझी आई कायम मला सांगायची अशा मुलासोबत लग्न कर, जो तुझ्यावर प्रचंड प्रेम करेल… मी माझ्या आईने आईने सांगितलेलं ऐकलं. पण माझ्या मुलीने काय केलं? माझ्या मुलीने ती ज्या मुलावर प्रेम करते, त्याच्यासोबत लग्न केलं आहे…’

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

यावर सोनाक्षी म्हणते, ‘वाद बरोबर आहे… मला असं वाटतं झहीर माझ्यावर अधिक प्रेम करतो आणि मला असं वाटतं की मी झहीरवर अधिक प्रेम करते…’ सध्या सर्वत्र सोनाक्षी आणि झहीर यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. यावर नेटकरी देखील प्रतिक्रिया देत आहेत.

एक नेटकरी म्हणाला, ‘सोनाक्षीने परिस्थिती अतिशय योग्य प्रकारे हाताळली आहे…’, अन्य नेटकरी म्हणाला, ‘लेकीच्या लग्नानंतर आई – वडील आनंदी नाहीत… स्पष्ट दिसत आहे….’ सांगायचं झालं तर, सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नाला 5 महिने झाले आहेत. तरी देखील सर्वत्र दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

सोनाक्षी सिन्हा – झहीर इक्बाल यांचं लग्न

तब्बल सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी सिन्हा – झहीर इक्बाल यांनी लग्न केलं. रजिस्टर्ड पद्धतीत दोघांनी लग्न केलं. कुटुंबियांच्या उपस्थितीत सोनाक्षी – झहीर यांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर दोघांनी पार्टी देखील ठेवली होती. पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.