सासू अन् आईला सोनाक्षीच्या ‘गुड न्यूज’ची प्रतीक्षा; शेअर केला भन्नाट व्हिडीओ

| Updated on: Dec 26, 2024 | 12:03 PM

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या प्रेग्नंसीच्या जोरदार चर्चा आहेत. अशातच तिने इन्स्टा स्टोरीमध्ये भन्नाट रील शेअर केली आहे. सासू आणि आईला सोनाक्षीच्या गुड न्यूजची प्रतीक्षा असल्याचं या रीलमधून स्पष्ट होतंय.

सासू अन् आईला सोनाक्षीच्या गुड न्यूजची प्रतीक्षा; शेअर केला भन्नाट व्हिडीओ
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल त्यांच्या आईंसोबत
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सहा महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न करत आयुष्याची नवी सुरुवात केली. लग्न झाल्यापासून हे दोघं सतत वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना दिसत आहेत. सध्या सोनाक्षी आणि झहीर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. या ट्रिपचे बरेच फोटो आणि व्हिडीओ दोघं सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. काही दिवसांपूर्वी सोनाक्षीच्या प्रेग्नंसीची जोरदार चर्चा होती. अशातच तिने ‘गुड न्यूज’बाबतची एक रील तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केली असून या रीलने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. या रीलद्वारे सोनाक्षीने अप्रत्यक्षपणे तिच्या सासू आणि आईला तिच्याकडून ‘गुड न्यूज’ची प्रतीक्षा असल्याचं म्हटलंय. या रीलमध्ये तिने पती झहीरलाही टॅग केलंय.

सोशल मीडियावर अनेकदा आपल्या परिस्थितीशी मिळतेजुळते रील्स स्टोरीमध्ये किंवा मित्रमैत्रिणींसोबत शेअर केले जातात. सोनाक्षीनेही असंच काहीसं केलंय. सध्या ती आणि झहीर जे अनुभवतायत, त्याच्याशीच मिळतीजुळती रील तिने शेअर केली आहे. यामध्ये एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर कंटाळल्याचे हावभाव दिसून येत असून त्याच्या मागे विमानाची खिडकी पहायला मिळतेय. त्यावर लिहिलंय, ‘POV: त्यांना नातवंडं देण्याऐवजी आम्हाला सतत फिरताना पाहणारी माझी आई आणि सासू,..’ पती झहीरला मेन्शन करत सोनाक्षीने त्यावर हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. झहीरनेही त्याच्या अकाऊंटवर ही रील शेअर केली आहे.

हे सुद्धा वाचा

सोनाक्षी आणि झहीर यांच्या फिरण्याचे फोटो आणि व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा कमेंट्स करतायत की, ‘आयुष्य जगावं तर असं..’ एकमेकांची मस्करी करण्यापासून ते प्रँक करण्यापर्यंत हे दोघं सुट्ट्यांमध्ये भरपूर एंजॉय करताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी सोनाक्षीने तिने प्रेग्नंसीच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली होती. “मी इथे स्पष्ट करू इच्छिते की मी प्रेग्नंट नाही. मी फक्त जाड झाली आहे. त्यादिवशी एका व्यक्तीने झहीरला शुभेच्छा दिल्या. त्यावर आम्हाला समजलं की काहीतरी गडबड आहे. आम्ही आमचं लग्न एंजॉय करू शकत नाही का?”, असं ती म्हणाली. हे ऐकल्यानंतर सोनाक्षीच्या बाजूलाच बसलेला झहीर मस्करीत म्हणतो, “.. आणि दुसऱ्या दिवसापासूनच तिचं डाएट सुरू झालं.”

सोनाक्षी पुढे म्हणाली, “आमच्या लग्नाला फक्त सहा महिने झाले आहेत आणि प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास आम्ही दोघं प्रवासातच खूप व्यस्त आहोत. आम्ही एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतोय आणि सतत कोणत्या ना कोणत्या लंच किंवा डिनरला जातोय.” प्रेग्नंसीच्या चर्चांबाबत झहीर पुढे म्हणतो, “गंमत म्हणजे या चर्चा एका साध्या फोटोमुळे सुरू झाल्या. आम्ही आमच्या पाळीव श्वानासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आणि त्यावरून चर्चा सुरू झाली की, ओह.. ती प्रेग्नंट आहे. या दोन गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे, असा मला प्रश्न पडला होता.” झहीरचं बोलणं झाल्यावर सोनाक्षी म्हणते, “लोक खूप वेडे आहेत.”