सोनाक्षी सिन्हाने लग्नाच्या 2 महिन्यातच घेतला मोठा निर्णय, फॅन्सला मोठा झटका
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या मुंबईतील घरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्न झाल्यानंतर २ महिन्यातच तिने मोठा निर्णय घेतला आहे. सोनाक्षीच्या या निर्णयावर चाहते देखील आश्चर्य व्यक्त करत आहे. सोनाक्षी सिन्हा हिचा विवाह २ महिन्यापूर्वीच झाला आहे. त्यावर चाहत्यांनी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा 23 जून 2024 रोजी तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत विवाह बंधनात अडकली होती. तिने मुंबईतील तिच्या अपार्टमेंटमध्ये लग्न केले होते. त्यानंतर तिने तिच्या मुंबईत एक भव्य रिसेप्शन दिले होते. ज्या घरात तिनं लग्न केले त्या घराबाबत आता सोनाक्षी सिन्हाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोनाक्षी सिन्हाचे मुंबईतील आलिशान अपार्टमेंट विक्रीसाठी आहे. ‘रिअल इस्टेट’ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सोनाक्षीच्या घराच्या किमतीसह व्हिडिओ शेअर केल्यानंतर ही बातमी चर्चेत आली. एक आलिशान समुद्राभिमुख घर’ असा या पोस्टमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. 4200 चौरस फूट सुपर एक्सपेंसिव्ह सी-फेसिंग अपार्टमेंट आहे. जे पूर्वी 4 BHK होते.
ज्या घरात तिने लग्न केले ते घर विकण्याचा ती विचार करत आहे. हा तिच्या चाहत्यांसाठी धक्का आहे. मात्र, सोनाक्षीने त्याचे डेकसह प्रशस्त २ बीएचकेमध्ये रूपांतर केले होते. अनेक आधुनिक सुविधांनी युक्त असे हे एक आलिशान अपार्टमेंट आहे. ही जागा 25 कोटींना विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. या चर्चेवर सोनाक्षीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी तिने इन्स्टाग्राम पोस्ट लाईक केली आहे.
व्हिडिओ अपलोड होताच नेटिझन्सनकडून कमेंटचा पाऊस पडला आहे. एका युजरने म्हटले की, सोनाक्षीचा अपार्टमेंट विकण्याचा ‘हताश’ प्रयत्न करत आहे, एका युजरने म्हटले की, इतक्या लवकर का? एका यूजरने लिहिले की, “सोनाक्षी सिन्हा गेल्या काही वर्षांपासून हे अपार्टमेंट विकण्यासाठी बेताब आहे. एक युजर विचारतोय की, “एवढ्या लवकर का?”
सोनाक्षी सिन्हा लग्नानंतर घर सजवताना दिसली होती
सोनाक्षी सिन्हाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक स्टोरी शेअर केली होती, ज्यामध्ये ती तिच्या बेडरूमची सजावट करताना दिसली होती. क्लिपमध्ये तिने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता आणि तिचे केस बनमध्ये बांधलेले होते. दुसऱ्या फोटोमध्ये, तिने फोटो फ्रेमची मालिका शेअर केली जी त्यांच्या लग्नातील सुंदर क्षण आहेत.