सोनाक्षी सिन्हाने लग्न होताच उचललं मोठं पाऊल, मुस्लीम पतीमुळे घेतला हा मोठा निर्णय
Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी सिन्हा हिने सात वर्षापासून डेट करत असलेल्या झहीर इक्बाल सोबत विवाह केला आहे. या विवाहाला सोनाक्षीची आई आणि भाऊ यांचा विरोध असल्याची चर्चा होती. दोघेही नाराज असल्याची चर्चा आहे. आता लग्नानंतर सोनाक्षीने महत्त्वाचे पाऊल उचललं आहे.
बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने 23 जून 2024 रोजी झहीर इक्बालसोबत विवाह केला आहे. मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांचा नोंदणीकृत विवाह झाला. सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोनाक्षी सिन्हाने 7 वर्षे डेट केल्यानंतर अखेर तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न केले आहे. लग्नानंतर लगेचच सोनाक्षीने पती झहीर इक्बालमुळे आश्चर्यकारक पाऊल उचलले.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी नोंदणीकृत विवाह केलाय. त्यानंतर दोघांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये वधू आणि वर पांढऱ्या पोशाखात दिसत होते.
दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने त्यांनी हिंदू आणि मुस्लीम रितीरिवाजाऐवजी रजिस्टर मॅरेजचा निर्णय़ घेतला होता. झहीर सोनाक्षीच्या हाताचे चुंबन घेताना दिसत आहे. यानंतर, दुसऱ्या फोटोत सोनाक्षी तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांचा हात धरताना दिसत आहे आणि तिचा पती झहीर लग्नाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोत सोनाक्षी आणि झहीर एकमेकांना पकडून हसतमुखाने पोज देताना दिसत आहेत.
हे फोटो शेअर करताना सोनाक्षी सिन्हाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- सात वर्षांपूर्वी (23.06.2017) या दिवशी आम्ही एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिले आणि ते कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. आज त्या प्रेमाने आम्हाला सर्व आव्हाने आणि विजयांमध्ये मार्गदर्शन केले आहे. आम्हाला या क्षणापर्यंत नेले आहे. जिथे आमचे कुटुंब आणि देव यांच्या आशीर्वादाने… आता आम्ही पती आणि पत्नी आहोत. आतापासून ते कायमचे एकमेकांसोबत प्रेम, आशा आणि सर्व सुंदर गोष्टी येथे आहेत. सोनाक्षी-झहीर 23-6-2024.
सोनाक्षी-झहीरने कमेंट सेक्शन केले बंद
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी ट्रोलिंग टाळण्यासाठी लग्नाचे फोटो पोस्ट केल्यानंतर लगेचच त्यांचा कमेंट सेक्शन बंद केला आहे. सोनाक्षी आणि झहीर यांच्या लग्नाची बातमी आल्यापासून युजर त्यांना ट्रोल करत आहेत. वेगवेगळ्या धर्मात लग्न केल्यामुळे दोघांना ट्रोल केले जात आहे. त्यामुळे त्यांच्या या वैवाहिक आनंदाचा भंग होऊ नये म्हणून त्यांनी कमेंट सेक्शनच बंद केले आहे.
दोघांच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत होती. अशा परिस्थितीत आपल्या मुस्लीम पतीला ट्रोल होण्यापासून वाचवण्यासाठी सोनाक्षी सिन्हाला कमेंट सेक्शन बंद करण्याचा मोठा निर्णय घ्यावा लागला.