शत्रुघ्न सिन्हा यांच्या संपत्तीत नाही सोनाक्षीचं नाव, अभिनेत्रीवर इतक्या कोटींचं कर्ज?
Shatrughan Sinha - Sonakshi Sinha | शत्रुघ्न सिन्हा यांची सर्व संपत्ती पत्नी आणि दोन मुलांच्या नावावर, लेक सोनाक्षी सिन्हा हिच्यावर इतक्या कोटी रुपयांचं कर्ज? सध्या सर्वत्र फक्त आणि सोनाक्षी हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा...
बॉलिवूडचे शॉटगन स्टार म्हणजे अभिनेते शत्रुघ्न सिन्हा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडे कोट्वधी रुपयांची संपत्ती आहे. आज शत्रुघ्न सिन्हा कुटुंबासोबत रॉयल आणि आलिशान आयुष्य जगत आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडे जमिनी, घरं आणि महागड्या गाड्या आहेत. नुकताच, शत्रुघ्न सिन्हा यांची लेक आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केलं. सांगायचं झालं तर, सोनाक्षीच्या वडिलांकडे गडगंज संपत्ती आहे. असं असून देखील सोनाक्षी हिला उधार घेत स्वतःचं घर घ्यावं लागलं.
सांगायचं झालं तर, संघर्षाच्या दिवसांत 5 हजार रुपयांच्या ॲम्बेसेडरमध्ये प्रवास करणारे शत्रुघ्न सिन्हा आज गडगंज संपत्तीचे मालक आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकतीच आसनसोलमधून निवडणूक लढवली आणि जिंकली. टीएमसीकडून निवडणूक लढवलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनीही त्यांच्या संपत्तीची माहिती त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली होती.
रिपोर्टनुसार, शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडे 210 कोटी रुपयांचा संपत्ती आहे. त्यांच्याकडे 10.93 कोटी रुपयांची चल संपत्ती आहे आणि त्यांच्या पत्नीकडे 10.40 कोटी रुपयांची चल मालमत्ता आहे. तर पूनम सिन्हा यांच्याकडे 155 कोटी रुपयांची संपत्ती आहे. शिवाय दोघांकडे 65.54 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिंह यांच्याकडेही करोडो रुपयांची शेतजमीन आहे. रामायणा नावाच्या त्यांच्या घराची किंमत 88 कोटी रुपये आहे. आहे. ‘रामायणा’ बंगल्यात सिन्हा कुटुंब राहातं. बंगला घर पूनम सिन्हा यांच्या नावावर आहे. याशिवाय दोघांकडे आणखी चार घरे आहेत. जे पटना, मुंबई, मेहरौली, डेहराडून आणि दिल्ली याठिकाणी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संपत्तीमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांच्या दोन्ही मुलांची नावे आहेत. पण लेक सोनाक्षी हिचं नाव नसल्याची माहिती समोर येत आहे. सोनाक्षी हिने वडिलांकडून 11.58 कोटी रुपये आणि आईकडून 4.77 कोटी रुपये उधार घेतले आहेत. म्हणजे सोनाक्षी हिच्यावर 16.35 कोटी रुपयांचं कर्ज आहे.
सोनाक्षी हिच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता सलमान खान स्टारर ‘दबंग’ सिनेमातून सोनाक्षी हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमात अभिनेत्रीची लोकप्रियता आणि प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. सध्या अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.