सोनाक्षी सिन्हा लग्नानंतर स्वीकारणार इस्लाम धर्म? अभिनेत्रीच्या सासऱ्यांची पहिली प्रतिक्रिया
Shatrughan Sinha on Daughters Wedding | झहीर इक्बाल याच्यासोबत लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा बदलणार धर्म? अभिनेत्रीच्या सासऱ्यांची पहिली प्रतिक्रिया, सोनाक्षी – झहीर यांच्या लग्नामुळे सिन्हा कुटुंबात नाराजीचं वातावरण होतं अशी देखील चर्चा रंगली होती.
गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अभिनेता झहीर इक्बाल आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. आता लकरच सोनाक्षी – झहीर चाहत्यांच्या समोर पती – पत्नी म्हणून येणार आहेत. सांगायचं झालं तर, सोनाक्षी – झहीर दोघांचा धर्म वेगळा असल्यामुळे चर्चांना उधाण आलं. झहीर याच्या कुटुंबियांनी नात्याला लगेच मान्यता दिली. पण सोनाक्षी हिला कुटुंबियांकडून लग्नासाठी होकार मिळायला वेळ लागला. दरम्यान, लग्नानंतर सोनाक्षी धर्म बदलून इस्लाम धर्म स्वीकारणार का? अशा चर्चांनी देखील जोर धरला होता.
सोनाक्षी हिंदू आहे तर, झहीर हा मुस्लिम असल्यामुळे अभिनेत्री धर्म बदलणार का? अशा चर्चा सुरु झाला. दरम्यान, यावर सोनाक्षी सिन्हा हिचे होणारे सासरे आणि झहीर याचे वडील इक्बाल रतनसी यांना रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही असं सांगितलं आहे.
इक्बाल रतनसी म्हणाले, ‘एक गोष्ट पक्की आहे आणि ती म्हणजे सोनाक्षी कधीच स्वतःचा धर्म बदलणार नाही. दोघे प्रेमाच्या नात्याने बांधले गेले आहेत. त्यामध्ये धर्माची कुठेच आणि कोणतीच भूमिका नाही..’ असं सोनाक्षी हिचे होणारे सासरे म्हणाले.
View this post on Instagram
पुढे इक्बाल रतनसी म्हणाले, ‘मी कायम माणूसकीवर विश्वास ठेवतो. हिंदू लोकं देवाला देव म्हणतात आणि मुसलमान अल्लाह म्हणतात… पण आपण प्रत्येक जण माणूस आहोत हे सत्य आहे. माझा आशीर्वाद कायम झहीर आणि सोनाक्षी यांच्यासोबत असले…’ असं देखील अभिनेत्रीचे होणारे सासरे इक्बाल रतनसी म्हणाले आहेत.
इक्बाल रतनसी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, झहीर याचे वडील इक्बाल रतनसी ज्वेलर्स आणि व्यापारी आहेत. सोनाक्षी हिच्या होणाऱ्या सासऱ्यांकडे गडगंज संपत्ती आहे. शिवाय इक्बाल कुटुंब रॉयल आयुष्य जगतं. बिल्डर व्यापारामध्ये इक्बाल कुटुंबाचं नाव आहे.
झहीरची आई गृहिणी आहे, त्याची बहीण एक सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे आणि त्याचा धाकटा भाऊ कंप्यूटर इंजीनियर म्हणून काम करतो. सोशल मीडियावर देखील झहीर कायम कुटुंबियांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो.
शिवाय अभिनेता सलमान खान याच्यासोबत देखील इक्बाल कुटुंबियांचे खास संबंध आहेत. झहीर याने 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नोटबूक’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमाची निर्मिती अभिनेता सलमान खान याने केली होती.