‘या’ दिग्दर्शकाची अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी, त्याचं नाव समोर येताच झगमगत्या विश्वात खळबळ
कास्टिंग काऊचमुळे अनेक अभिनेत्रींना करावा लागलाय वाईट परिस्थिती सामना... आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने दिग्दर्शकाचं नाव घेत केलाय मोठा खुलासा... ... 'दिग्दर्शकाच्या त्या कृत्यामुळे मी प्रचंड घाबरली होती...', झगमगत्या विश्वात खळबळ, सध्या सर्वत्र अभिनेत्रीने केलेल्या आरोपांची चर्चा...
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी करियरमध्ये कास्टिंग काऊच सारख्या संकटाचा सामना केला आहे. पूर्वी अभिनेत्री त्यांच्यासोबत घडणाऱ्या गोष्टी सांगत नव्हत्या, पण आता अभिनेत्री त्यांच्यावर झालेले अन्याय मनात कोणतीही भीती न बाळगता सांगतात. टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनव वेंगुर्लेकर हिने देखील तिच्यावर झालेल्या अन्यायाचा खुलासा केला. अभिनेत्रीने दिग्दर्शकाचं नाव घेत, त्याने केलेल्या शरीरसुखाच्या मागणीवर मौन सोडलं होतं. ज्या दिग्दर्शकावर अभिनेत्रीवर आरोप केले, तो दुसरा तिसरा कोणी नसून कास्टिंग दिग्दर्शक आणि फोटोग्राफर राजा बजाज होता.
राजा बजाज याचं नाव घेत सोनल म्हणाली, ‘मी शुटिंगचा भाग नव्हती तरी देखील कास्टिंग दिग्दर्शकाने मला ड्रेस बदलण्यासाठी दिला होता. त्यानंतर त्याने बळजबरी माझ्या शरीराला क्रिम लावली. त्याच्या अशा कृत्यामुळे मला प्रचंड भीती वाटली होती. ही तर पहिली घटना होती. त्यानंतर रात्री तो माझ्या खोलीत जबरदस्ती घुसला आणि एका रात्रीत इंडस्ट्रीमध्ये लोकप्रियता कशी मिळवावी यासाठी तंत्र विद्या शिकवू लागला…’
‘तंत्र विद्या शिकण्यासाठी त्याने मला पूर्ण नग्न होण्यास सांगितलं आणि मंत्राचा जप करण्यासाठी सांगितलं. मी बोलेल तसं माझ्या मागून बोल असं त्यानं मला सांगितलं. मी नकार दिल्यानंतर त्याने माझ्यावर बळजबरी केली. पण मी स्वतःचा बचाव केला. मी थेट मॉडेलच्या रुममध्ये गेली जेथे ती तिच्या आईसोबत होती.’ या धक्कादायक घटनेनंतर सोनल हिने पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनल वेंगुर्लेकर हिची चर्चा रंगली आहे. सोनल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने फार कमी वयात करियरला सुरुवात केली. सोनल हिने आतापर्यंत ‘वादा रहा’, ‘ये तेरी गालिया’, ‘साम दाम दंड भेद’, ‘गुप्ता ब्रदर्स’, ‘शास्त्री सिस्टर्स’, यांसारख्या अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
सोशल मीडियावर देखील सोनल वेंगुर्लेकर कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यंची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनल वेंगुर्लेकर हिची चर्चा रंगली आहे.