बेक्कार अपमान… सोनाली बेंद्रे येताच जया बच्चन यांनी ढुंकूनही पाहिलं नाही; अशी काय ठस्सन?
जया बच्चन या त्यांच्या विधानामुळे जोरदार चर्चेत असतात. जया बच्चन यांनी मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. जया बच्चन यांचे सतत सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. जया बच्चन यांचा सध्या अशाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओ पाहून लोक हैराण झालेत.
मुंबई : जया बच्चन यांनी बाॅलिवूडमध्ये मोठा काळ गाजवला आहे. जया बच्चन या कायमच चर्चेत असतात. जया बच्चन यांचे नेहमीच फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. बऱ्याच वेळा पापाराझी यांना खडेबोल सुनावताना जया बच्चन या दिसतात. जया बच्चन यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर अनेकदा जोरदार टीका देखील होते. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होताना दिसतंय. मात्र, असे असताना देखील बच्चन कुटुंबियांकडून यावर अजिबातच भाष्य हे करण्यात आले नाहीये. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचे देखील काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.
नुकताच आमिर खान याची लेक इरा खान हिचे लग्न उदयपूरमध्ये अत्यंत शाही थाटामध्ये पार पडले. या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. आता नुकताच आमिर खान याने मुंबईमध्ये रिसेप्शनचे आयोजन केले. या रिसेप्शनला जवळपास सर्वच बाॅलिवूड कलाकारांना आमंत्रण होते.
या रिसेप्शनला जया बच्चन या मुलगी श्वेता बच्चन हिच्यासोबत पोहचल्या. यावेळीचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरस होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोक हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर या व्हिडीओनंतर जया बच्चन यांच्यावर जोरदार टीका ही केली जातंय. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये दिसतंय की, जया बच्चन आणि श्वेता बच्चन या पापाराझी यांना पोझ देत होत्या. त्यावेळीच तिथे सोनाली बेंद्रे पोहचली. हे जया बच्चन यांना पटलेले दिसत नाहीये. सोनाली बेंद्रे येताच जया बच्चन या कोणताही विचार न करता तिथून थेट निघून जातात. हे पाहून तिथे उपस्थित सर्वच लोक हे चांगलेच हैराण होतात.
हा घडलेला सर्व प्रकार श्वेता बच्चन हिच्या लक्षात येतो आणि ती आई जया बच्चन हिला थांबवण्याचा प्रयत्न करते. श्वेता बच्चन म्हणते की, ही आताच इथे आलीये…त्यानंतर मग परत जया बच्चन या येतात. हाच व्हिडीओ व्हायरल होतोय. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत थेट म्हटले की, आता जया बच्चन यांचे जरा जास्तच होतंय. अनेकांनी थेट म्हटले की, सोनाली बेंद्रेचा बेक्कार अपमान जया बच्चन यांनी केला.