सोनाली बेंद्रे ठरली चाहत्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत, नक्की काय आहे प्रकरण?

Sonali Bendre | चाहत्याच्या मृत्यूचा थेट संबंध अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्यासोबत, नक्की काय आहे प्रकरण? नुकताच झालेल्या मुलाखतीत मोठा खुलासा, अभिनेत्री म्हणाली, 'असा वेडेपणा...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली बेंद्रे हिची चर्चा...

सोनाली बेंद्रे ठरली चाहत्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत, नक्की काय आहे प्रकरण?
Follow us
| Updated on: Jun 17, 2024 | 8:08 AM

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. करियरच्या सुरुवातीला सोनाली हिने अनेक जाहिरातींमध्ये काम करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्यांनंतर अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सिनेमांमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्रीने सोनाली हिने स्माईल आणि सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं. तेव्हा सोनाली हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी होत. कधी अभिनेत्रीला चाहत्यांकडून भेटवस्तू यायच्या तर कधी रक्ताने लिहिलेले पत्र.. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मोठी माहिती समोर आली आहे.

सोनाली बेंद्रे हिला भेटू न शकल्यामुळे एका चाहत्याने स्वतःचे प्राण संपवले होते. नदीमध्ये उडी मारून चाहत्याने स्वतःचे प्राण संपवले. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीला चाहत्याच्या निधनाबद्दल विचारण्यात आलं. यावर हैराण होत अभिनेत्री म्हणाली, ‘ही घटना खरी आहे? कोणी असं कसं करु शकतं…’ ही घटना 1991 मध्ये अभिनेत्री जेव्हा भोपाळ याठिकाणी गेली होती, तेव्हा घडली असल्याचं सांगण्यात येत आहे.

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘चाहत्यांच्या रक्ताने लिहिलेले पत्र यायचे. खरंच रक्त आहे याची तपासणी देखील करण्यात आली होती. असं काही आपल्यामुळे होत असेल तर प्रचंड वाईट वाटतं. तुम्ही कौतुक करा आणि तिथेच विषय संपवा. कोणालाही एवढा मोठा दर्जा देण्याची काहीही गरज नाही. मला असा वेडेपणा समजतच नाही..’

‘मला कळत नाही, कोणी कोणत्या दुसऱ्या व्यक्तीला एवढा दर्जा का देतो? तुम्ही ज्या व्यक्तीला आज मोठेपणा देत आहात, तो व्यक्ती त्या ठिकाणी कायम नसणार आहे. त्यामुळे मी कधीच कोणाला देखील मर्यादेपेक्षा मोठा दर्जा देत नाही…’ असं देखील सोनाली म्हणाली.

सोनाली हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं. सुरुवातीला फक्त जाहिरातींमध्ये झळकणाऱ्या सोनाली हिने 1994 साली प्रदर्शित झालेल्या ‘आग’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात सोनाली हिच्यासोबत अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अभिनेता गोविंदा होता.

सोनाली हिने अभिनेता अजय देवगन याच्यासोबत ‘दिलजले’, आमिर खान याच्यासोबत ‘सरफरोश’ आणि सलमान खान याच्यासोबत ‘हम साथ साथ है’, शाहरुख खान याच्यासोबत ‘डुप्लीकेट’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर सोनाली हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.