सोनम कपूरच्या अंगावरील दागिने उधारीचे? अंबानी कुटुंबाच्या प्री-वेडिंग इव्हेंटमध्ये काय घडलं?
Sonam Kapoor | वडील - पती गडगंज श्रीमंत असताना सोनम कपूरने घातले उधारीचे दागिने? राधिका - अनंत यांच्या प्री-वेडिंग इव्हेंटमध्ये काय घडलं? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनम कपूरच्या उधारीच्या दागिन्यांची चर्चा...
मुंबई | 5 मार्च 2024 : अंबानी कुटुंबातील अनंत आणि राधिका यांचा प्री-वेडिंग सेलिब्रेशन मोठ्या थाटात पार पडला. सेलिब्रेशनमध्ये अनेक भारतीय आणि परदेशातील पाहुणे देखील उपस्थित होते. सेलिब्रेशनचा शेवटच्या दिवसाची थीम परंपरेवर आधारलेली होती. शेवटच्या दिवशी प्रत्येक सेलिब्रिटींनी खास लूक केला होता. सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहे. सेलिब्रेशनमधील सेलिब्रिटींचे हटके लूक सध्या तुफान चर्चेत आहेत. पण सध्या चर्चा रंगत आहे अभिनेत्री सोनम कपूर हिच्या लूकची.
जेव्हा पार्टीतील सोनम कपूरचा लूक समोर आला, तेव्हा चाहते घायाळ झाले. लडाखच्या पारंपारिक पोशाखात आलेली सोनम प्रचंड शाही आणि सुंदर दिसत होती. सर्वत्र सोनम कपूर हिच्या लूकची चर्चा रंगली आहे. सोनम हिने घातलेले कपडे नामझा डिजाइनिंग हाउसने डिझाईन केला होता. सोनमचा हा सिल्क आउटफिट बनारसी कारागिरांनी बनवला होता. आउटफिटवर केलेली फिनिक्स एम्ब्रॉयडरी सोनमच्या लूकमध्ये आणखी भर घालत होती.
दरम्यान, हटकेलूकवर सोनमने दागिने घातले होते. पण अभिनेत्रीने घातलेले दागिने तिचे स्वतःचे नव्हते, तर आई सुनीता कपूर, काकू कविता सिंह आणि सासू प्रिया आहुजा यांच्या कलेक्शनमधून सोनमने दागिने घेतले होते. याआधी देखील सोनम हिने कुटुंबातील इतर महिलांचे दागिने घातले होते.
सोनम कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. सोनम आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील सोनम हिची चर्चा रंगलेली असते.
मुलगा वायू याचा जन्म झाल्यानंतर सोनम हिने बॉलिवूडपासून दूर जाण्यचा निर्णय घेतला. अभिनेत्री पती आणि मुलासोबत कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केरत असते. पण अभिनेत्री मुलासाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवली आहे. सोनम मुलगा वायूचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते, पण अभिनेत्रीने लेकाचा चेहरा दाखवलेला नाही.
सोनम आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.