अखेर सोनम कपूर हिने खास फोटो शेअर करत चाहत्यांना दिले मोठे गिफ्ट, अभिनेत्रीने…
बाॅलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे सोनम कपूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. अभिनेत्री ही आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते.
मुंबई : अनिल कपूर यांची लेक आणि बाॅलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही कायमच चर्चेत असते. सोनम कपूर हिचे 2018 मध्ये व्यावसायिक आनंद आहूजा याच्यासोबत लग्न झाले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सोनम कपूर आणि आनंद आहूजा हे पालक झाले आहेत. सोनम कपूर हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सोनम कपूर हिने आपल्या बाळाचे नाव वायु ठेवले. मात्र, यापूर्वीच कधीच सोनम कपूर हिने आपला बाळाचा फोटो शेअर केला नाही.
नुकताच सोनम कपूर हिने वायुची एक झलक दाखवलीये. विशेष म्हणजे सोनम कपूर हिचा लेक दिसायला अत्यंत गोड असल्याचे फोटोमधून दिसत आहे. आता सोनम कपूर हिने शेअर केलेला हा फोटो तूफान व्हायरल होताना दिसतोय. सोनम कपूर हिचे चाहते या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
सोनम कपूर हिने अनंत आहूजा याच्यासोबत हा फोटो शेअर केलाय. विशेष म्हणजे सोनम कपूर हिचा दिर अनंत आहूजा याच्या मांडीवर वायु हा बसल्याचे दिसतंय. हा फोटो शेअर करत सोनम कपूर हिने अनंत आहूजा याला वाढदिवसाच्या शुभेच्छा या दिल्या आहेत. सोनम कपूर सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करते.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वीच सोनम कपूर ही आपल्या नव्या घरात शिफ्ट झालीये. सोनम कपूर हिचे हे घर अत्यंत आलिशान आहे. सोनम कपूर हिने नवीन घरातील फोटो शेअर करत आपण नवीन घरात शिफ्ट झाल्याचे सांगितले. सोनम कपूर ही काही दिवसांपूर्वीच वायुच्या जन्मानंतर व्यायाम करताना दिसली. सोनम कपूर सध्या तिच्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसतंय.
अनिल कपूर यांच्या इंस्टा अकाऊंटवरील सर्व पोस्ट डिलीट करण्यात आल्या. इतकेच नाही तर डिपीचा फोटो देखील काढण्यात आला. यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. इतकेच नाही तर सोनम कपूर हिने देखील एक पोस्ट शेअर करत हे काय म्हणत वडिलांना प्रश्न केला. यानंतर विविध चर्चा या रंगताना देखील दिसल्या.