‘दिव्या भारती असती तर आज अनेक लोक बेरोजगार असते…’, बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री असं का म्हणाली?
वयाच्या १९ व्या वर्षी दिव्या भारती हिने घेतला अखेरचा श्वास... दिव्या आज जीवंत नसतानाही तिच्याबद्दल रंगत आहेत अनेक चर्चा...
मुंबई | बॉलिवूडमध्ये स्वतःची खास ओळख तयार करत काही सेलिब्रिटींनी जगाचा निरोप घेतला. पण काही अभिनेते, अभिनेत्री अशा आहेत, ज्यांना आजही चाहते विसरु शकलेले नाहीत. आजही सोशल मीडियावर अशा सेलिब्रिटींची फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यांना चाहत्यांनी प्रचंड प्रेम दिलं, पण सेलिब्रिटीं मात्र चाहत्यांची साथ सोडली. पण चाहते त्यांच्या आवड्या सेलिब्रिटीला विसरू शकले नाहीत. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिव्या भारती. दिव्या भारती हिने काही सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. दिव्या भारती हिचं ‘ऐसी दिवानही…’ हे गाण आजही चाहत्यांच्या पसंतीचं गाणं आहे.
आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री दिव्या भारती आज आपल्यात नाही. पण अभिनेत्रीच्या अनेक आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत. दरम्यान, ‘ओए… ओए…’ गाण्याच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री सोनम खान (Sonam Khan) हिने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत दिव्या भारती हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
सोनम खान म्हणाली, ‘दिव्या भारती आणि माझ्यामध्ये सर्व काही ठिक होतं. आमची मैत्री खास होती. कारण आम्ही एकाच वयाच्या होतो. आम्ही एकमेकींसोबत आनंदी असोयचो. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा नव्हाती. दिव्याचा स्वाभाव फार चांगला होता. मी दिव्याला सांगितलं की, अभिनय सोडण्याचा विचार करत आहे…’
‘आज दिव्या या जगात नाही, पण जर दिव्या भारती आज जिवंत असती, तर अनेक लोक बेरोजगार असते…’ सोनम खान हिने दिव्याचं कौतुक करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. पुढे सोनम म्हणाली, ‘तिच्या चेहऱ्यावर कायम आनंद असायचा.. दिव्या लोकांना सरळ-सरळ उत्तरं द्यायची… मग तो टॉपिक कोणताही असू देत…’ सध्या सर्वत्र सोनम खान आणि दिव्या भारती यांच्या मैत्रीच्या चर्चा रंगत आहेत.
दिव्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने वयाच्या १९ व्या वर्षी अखेरच्या श्वास घेतला. दिव्याच्या निधनाला आज अनेक वर्ष लोटली आहेत, पण तरी देखील चाहते अभिनेत्रीला विसरु शकेलले नाहीत. वयाच्या १९ व्या वर्षी दिव्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं होतं. दिव्याने १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘बोबिली राज’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं…
दिव्या भारती हिने, ‘दिवाना’, ‘शोला और शबनम’, ‘रंग’, ‘दिल का क्या कसूर’, ‘बलवान’, ‘गीत’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.