Sonu Nigam | सोनू निगमने घेतली योगी आदित्यनाथांची भेट, राम मंदिर निर्माणासाठी ‘वीट’ भेट देण्याची इच्छा!

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांची भेट घेतली.

Sonu Nigam | सोनू निगमने घेतली योगी आदित्यनाथांची भेट, राम मंदिर निर्माणासाठी ‘वीट’ भेट देण्याची इच्छा!
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 5:05 PM

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांची भेट घेतली. या दोघांची ही खास भेट मुख्यमंत्री निवासस्थानी झाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोनू निगमच्या भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाँच केलेले नवे नाणे’ आणि कुंभमेळ्यावर लिहिलेल्या पुस्तकाची प्रत भेट म्हणून भेट दिली. योगी आदित्यनाथ यांच्या ऑफिसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांची आणि सोनू निगमची काही छायाचित्रे पोस्ट करत याची माहिती दिली गेली आहे (Sonu Nigam Meets UP CM Yogi Adityanath)

अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या फोटोंमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गायक सोनू निगम यांना नाणे आणि पुस्तक भेट म्हणून देताना दिसत आहेत. ही छायाचित्रे शेअर करताना या ट्विटमध्ये लिहिले की, “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी पार्श्वगायक सोनू निगम यांची त्यांच्या लखनऊ येथील अधिकृत निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सोनू निगम यांना श्री राम जन्मभूमी मंदिरवर आधारित चांदीचे नाणे आणि कॉफी टेबल बुक प्रदान केले.”

योगी आदित्यनाथ यांची विचारसरणी देशासाठी फायदेशीर! मुख्यमंत्री योगी यांची भेट घेतल्यानंतर सोनू निगम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘मुख्यमंत्री योगी एक गतिशील नेते आणि दूरदर्शी आहेत. त्यांची विचारसरणी देशासाठी फायदेशीर असल्याचे देखील मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. राष्ट्र उभारणीत आपण कसा भाग घेऊ शकतो, हे त्यांनी प्रत्येकाला सांगायला हवे.’(Sonu Nigam Meets UP CM Yogi Adityanath)

यापूर्वी रविवारी पार्श्वगायक सोनू निगम यांनी अयोध्येत जाऊन रामजन्मभूमीवर भगवान राम यांची पूजा केली. त्यांनी रामजन्मभूमीला भेट दिली तेव्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते संजय निरुपमही त्यांच्यासमवेत अयोध्येत होते. यावेळी सोनू निगम देखील भगवान रामाच्या आरतीमध्ये सहभागी झाला होता. यानंतर सोनू यांनी हनुमान गढी मंदिरालाही भेट दिली. ‘मला बर्‍याच वर्षांपासून अयोध्येत यायचे होते आणि आता अखेर माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे’, असे सोनू निगम म्हणाले.

राम मंदिर निर्माणासाठी वीट देण्याची इच्छा यासह राम मंदिराच्या बांधकामासाठी आपल्याला देखील वीट भेट करायची आहे, अशी इच्छा सोनू निगम यांनी व्यक्त केली. अयोध्येत रामलला भेट दिल्यानंतर आणि मुख्यमंत्री योगी यांच्याशी भेट घेतल्यानंतर सोनू निगम वाराणसीला काशी विश्वनाथच्या दर्शनासाठी रवाना होणार आहे.

संबंधित बातम्या : 

Shocking | राम गोपाल वर्माचं वादग्रस्त वक्तव्य, दाऊद इब्राहीमचे मानले आभार!

कंगनाचा पुन्हा स्वराशी पंगा, प्रत्युत्तराने फॅन्सचा सोशल मीडियावर दंगा…!

(Sonu Nigam Meets UP CM Yogi Adityanath)

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.