Sonu Sood: भविष्यात कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारणार सोनू सूद? अभिनेत्याच्या वक्तव्याने चाहते हैराण

गरजू व्यक्तींच्या मदतीला धावून जाणारा सोनू सूद स्वीकारणार कॅनडाचे नागरिकत्व? अभिनेत्याच्या वक्तव्याने चाहते हैराण... सध्या सर्वत्र सोनू सूद याची चर्चा...

Sonu Sood: भविष्यात कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारणार सोनू सूद? अभिनेत्याच्या वक्तव्याने चाहते हैराण
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 2:02 PM

मुंबई | अभिनेता सोनू सूद त्याच्या सिनेमांमुळे कमी तर त्याच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. गरजूंच्या मदतीला कोणतीही पर्वा न करता धावणारा सोनू अनेकांचा ‘रियल हिरो’ आहे. सोनूच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोनूची एक झलक पाहण्यासाठी आणि अभिनेत्यासोबत गप्पा मारण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आता देखील एका महत्त्वाच्या कारणामुळे अभिनेता चर्चेत आला आहे. अभिनेत्याने नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला. सोनूने आक्स सोनू सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संबाद साधला. यावेळी अभिनेत्याने चाहत्यांची प्रश्नांची उत्तरं देखील वेगवेगळ्या अंदाजात दिली..

सोनू सेशन दरम्यान चाहत्याने सोनूला विचारलं की, ‘जर तुमचे सिनेमे फ्लॉप ठरले तर तुम्ही भविष्यात कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारणार का?’ या प्रश्नाचं उत्तर वेगळ्या पद्धतीत दिल्यामुळे सोनू चाहत्यांमध्ये चर्चेत आहे… अभिनेता म्हणाला, ‘आयुष्य सिनेमापेक्षा फार मोठं आहे. आपल्या भारतापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही…’ सध्या सोनू सेशनमुळे अभिनेता तुफान चर्चेत आहे.

अन्य एका चाहत्याने अभिनेत्याला विचारलं. ‘तुला लोक देव म्हणतात.. तर तुला असं ऐकून असं वाटतं…’ चाहत्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेता म्हणाला, ‘मी एक सामान्य व्यक्ती आहे आणि मी दुसऱ्या सामान्य व्यक्तीसोबत संपर्क साधण्यासाठी प्रयत्न करत असतो…’

हे सुद्धा वाचा

पुढे एक युजर म्हणतो, ‘मला बुलेट हवी आहे. पण माझे घरातले मला बुलेट खरेदी करुन देत नाहीत, मला बुलेट दे..’ यावर विनोदी अंदाजात अभिनेत्री म्हणाली, ‘नंतर पेट्रोल देखील मागशील…’ अन्य एक युजर म्हणाला, ‘सर प्लिझ माझी पत्नी गोलू हिला सांगा मी तिच्यावर प्रचंड प्रेम करतो…’ पुढे अभिनेता विनोदी अंदाजात म्हणाला, ‘गोलू वहिनी… सोहेल भाई तुमच्यावर फिदा आहेत, त्यांची काळजी घ्या…’ सध्या सोनू सूद याची चर्चा रंगलेली आहे.

सोनू सूद याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘फतेह’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या अभिनेता सिनेमासाठी तयारी करत आहे. अभिनेत्याचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर देखील अभिनेता कायम सक्रिय असतो.

अभिनेता गेल्या काही दिवसांपासून अनेकांची मदत करत आहे. अभिनेत्याच्या याच स्वभावामुळे देशभरातील जनतेचं सोनू सूद याला प्रेम मिळत आहे. अनेक सिनेमांमध्ये खलनायकाच्या भूमिकेला न्याय देणारा सोनू सूद खऱ्या आयुष्यात मात्र अनेकांचा ‘हिरो’ झाला आहे. सोनूच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.