Baba Bageshwar यांच्या दर्शनाला सोनू सूद, शहनाज गिल यांच्यासारखे प्रसिद्ध सेलिब्रिटी
Baba Bageshwar : 'आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद...', बाबा बागेश्वर यांच्या दर्शनासाठी अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी लावली हजेरी... सोशल मीडियावर सर्वत्र व्हिडीओ व्हायरल.... याआधी देखील अनेक सेलिब्रिटींनी घेतले आहेत बाबा बागेश्वर यांचं दर्शन
Baba Bageshwar : लोकांचं मन वाचणारे, मनातील ओळखणारे बाबा असा दावा करण्यात येणारे बाबा बागेश्वर (Baba Bageshwar) सध्या लोकप्रिय आहेत. देशभरात त्यांच्या भक्तांची संख्या देखील फार मोठी आहे. बाबा बागेश्वर यांना भेटण्यासाठी अनेक प्रसिद्ध आणि दिग्गज लोकं रांगेत असतात. झगमगत्या विश्वातील अनेक सेलिब्रिटी देखील बाबा बागेश्वर यांच्या दर्शनासाठी जात असतात. नुकताच अभिनेता सोनू सूद, अभिनेत्री शहनाज गिल, जॅकलिन फर्नांडिस आणि बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादव या सेलिब्रिटींनी बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांचं दर्शन घेतलं. बाबा बागेश्वर यांच्यासोबत सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये सोनू सूद बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांच्या गळ्यात पुष्पहार घालून स्वागत करताना दिसत आहे. शहनाजने हिरव्या रंगाचा पारंपारिक सूट घातलेला दिसत आहे, तर दुसरीकडे जॅकलिनने गुलाबी रंगाचा को-ऑर्डर सेट घातला आहे. काळ्या जॅकेटमध्ये एल्विश याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओची चर्चा रंगत आहे.
View this post on Instagram
बाबा बागेश्वर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, धीरेंद्र शास्त्री हे भारतातील मध्य प्रदेशातील धार्मिक तीर्थक्षेत्र बागेश्वर धाम सरकारचे हिंदू पुजारी आहेत. छतरपूर येथील बागेश्वर धाम येथे कथा वाचण्यासाठी ते ओळखले जातात. राघव शर्मा याने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर त्याच्या चाहत्यांशी संवाद साधतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे.
व्हिडीओ शेअर करत राघव शर्मा म्हणाला, “बाबा बागेश्वर धाम सरकार जी… तुम्ही आल्याबद्दल आणि आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद. जय श्री राम, बागेश्वर धाम सरकार.” राघव याने पोस्ट केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शहनाज आणि जॅकलिन देखील दिसत असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. याआधी देखील अनेक अभिनेत्री, अभिनेत्री बाबा बागेश्वर यांच्या दर्शनासाठी गेले होते. सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह देखील बागेश्वर बाबाच्या दर्शनासाठी आली होती.