Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कौतुकास पात्र असलेला एकमेव स्टारकिड’; वडिलांच्या अनुपस्थितीत सोनू सूदच्या मुलाने केलेल्या कामाचं कौतुक

'हे कुटुंब नेहमीच इतर सर्व मोठ्या सेलिब्रिटींपेक्षा आणि श्रीमंतांपेक्षाही वर राहील. त्यांचं कामच त्यांची ओळख आहे', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. 'लहान वयात हा मुलगा खूप छान काम करतोय. देव त्याचं आणि त्याच्या कुटुंबीयांचं भलं करो', असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

'कौतुकास पात्र असलेला एकमेव स्टारकिड'; वडिलांच्या अनुपस्थितीत सोनू सूदच्या मुलाने केलेल्या कामाचं कौतुक
Sonu Sood son Ishan SoodImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 1:20 PM

मुंबई : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूदने गरजूंची खूप मदत केली. मदतीचा हा ओघ त्याने नंतरही कायम ठेवला. सोनूच्या घराबाहेर दररोज मदत मागणाऱ्यांची रांग लागते आणि तो स्वत: त्यांची वैयक्तिक भेट घेऊन तक्रारी ऐकतो. असंख्य गरजूंची मदत करणारा सोनू सूद ‘देवदूत’ म्हणून ओळखू लागला. कोणताही गाजावाजा न करता त्याने मदतीचं हे कार्य सुरू ठेवलं आहे. आता त्याचा मुलगा ईशान सूद हा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत लोकांची मदत करताना दिसून येत आहे. वडिलांच्या अनुपस्थितीत तो त्यांच्या मदतकार्याची जबाबदारी उचलत आहे. ईशानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये ईशान सूद हा त्याच्या घराबाहेर जमलेल्या लोकांच्या तक्रारी ऐकताना दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला लोकांनी घोळका केला आहे आणि त्याच्याकडे मदतीची मागणी करताना दिसत आहेत. लोकांच्या गर्दीत तो शांतपणे त्यांच्या समस्या ऐकतोय आणि त्यांच्याशी बोलतोय. या व्हिडीओवर सोनू सूदचे चाहते कमेंट करत ईशानचं तोंडभरून कौतुक करत आहेत.

हे सुद्धा वाचा

‘बॉलिवूड अभिनेत्याचा हा असा एकमेव मुलगा आहे ज्याचं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे. सोनू सूद आणि त्याच्या कुटुंबीयांवर आम्हाला खूप अभिमान आहे. पालकांचे संस्कार हेच असतात. बॉलिवूडमधील इतर स्टारकिड्स अर्धनग्न कपडे घालून पार्ट्यांमध्ये जाण्यात व्यस्त आहेत आणि दुसरीकडे ईशान वडिलांचं परोपकाराचं काम पुढे नेत आहे’, असं एकाने लिहिलंय. तर ‘हे कुटुंब नेहमीच इतर सर्व मोठ्या सेलिब्रिटींपेक्षा आणि श्रीमंतांपेक्षाही वर राहील. त्यांचं कामच त्यांची ओळख आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘लहान वयात हा मुलगा खूप छान काम करतोय. देव त्याचं आणि त्याच्या कुटुंबीयांचं भलं करो’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

पहा व्हिडीओ

सोनू सूदने गर्लफ्रेंड सोनालीशी 1996 मध्ये लग्न केलं. या दोघांना ईशान आणि अयान ही दोन मुलं आहेत. ईशानच्या वाढदिवशी सोनूने त्याला महागडी कार भेट दिल्याची मध्यंतरी चर्चा होती. मात्र सोनूने या चर्चांना फेटाळलं होतं.

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.