Sonu Sood: सोनू सूदने IAS विद्यार्थ्यांसाठी सुरू केलं मोफत कोचिंग; अशा पद्धतीने करू शकता अर्ज

सोनू सूद आयएएस परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग सुरू करणार आहे. सोनूने त्याच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्याने कोचिंगबद्दलची माहिती दिली आहे.

Sonu Sood: सोनू सूदने IAS विद्यार्थ्यांसाठी सुरू केलं मोफत कोचिंग; अशा पद्धतीने करू शकता अर्ज
Sonu SoodImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 5:05 PM

अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात गरीब कामगारांसाठी देवदूत बनून त्यांच्या मदतीला धावून आला होता. आजही तो असंख्य लोकांना मदत करतोय. इतकंच नाही तर प्रत्येक आठवड्याच्या अखेरीस त्याच्या घराबाहेर मदत मागणाऱ्यांची मोठी रांग पहायला मिळते. देशभरातील विविध ठिकाणाहून लोक मदतीसाठी त्याच्या घराबाहेर रांग लावतात. स्वत: सोनू सूद त्यांची भेट करून त्यांना मदतीचं आश्वासन देतो. आता त्याने विद्यार्थ्यांसाठी (Students) एक नवीन पुढाकार घेतला आहे.

सोनू सूद आयएएस परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग सुरू करणार आहे. सोनूने त्याच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्याने कोचिंगबद्दलची माहिती दिली आहे. सोनू सूदने लिहिलं, ‘चला मिळून नवा भारत घडवूया. 22-23 ची संभाव्य सुरुवात. IAS परीक्षेसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग.’ त्याने आणखी एका ट्विटमध्ये लिहिलं, ‘आयएएसची तयारी करायची असेल तर आम्ही तुमची जबाबदारी घेऊ.’

हे सुद्धा वाचा

या मोफत कोचिंगसाठी विद्यार्थी सोनू सूद फाऊंडेशन ग्रुपच्या लिंकवर नोंदणी करू शकतात. याशिवाय नोंदणीसाठी फाऊंडेशनने ठरवून दिलेली फी भरावी लागेल. या कोचिंगद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना देशातील सर्वोच्च नागरी सेवा संस्थांमध्ये मोफत ऑनलाइन आयएएस कोचिंग दिलं जाईल. याशिवाय फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे.

कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या काळात त्याने मुंबईत अडकलेल्या असंख्य मजुरांची त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत केली होती. तेव्हापासून सोनू सूदचा उल्लेख ‘देवदूत’ असा करू लागले. त्याने फक्त लॉकडाऊनपुरतीच ही मदत केली नाही, तर त्यानंतरही त्याच्या मदतीचा ओघ सुरूच ठेवला. गरजूंना आरोग्य, शिक्षण, इतर सेवा पुरवण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.