Sonu Sood Vs BMC | सोनू सूदला मोठा दिलासा, कोर्टाकडून निकाल राखीव

बीएमसी तर्फे युक्तिवाद करण्यात आला की निवासी इमारतीमध्ये व्यवसायिक गतिविधि ठेवण्याची परवानगी देता येणार नाही. पण यावर न्यायमूर्तिंकडून आदेश सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

Sonu Sood Vs BMC | सोनू सूदला मोठा दिलासा, कोर्टाकडून निकाल राखीव
Follow us
| Updated on: Jan 13, 2021 | 5:19 PM

मुंबई : अभिनेता सोनू सूद प्रकरणात कोर्टाने निकाल राखीव ठेवला आहे. या प्रकरणात आज हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी सोनू सूदच्या वकीलांनी कोर्टात सांगितलं की, आमच्याकडे आवश्यक परवानगी आहे. मात्र, बीएमसी तर्फे युक्तिवाद करण्यात आला की निवासी इमारतीमध्ये व्यवसायिक गतिविधि ठेवण्याची परवानगी देता येणार नाही. पण यावर न्यायमूर्तिंकडून आदेश सुरक्षित ठेवण्यात आला आहे. त्यामुळे यावर आता पुढे या निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. (Sonu Sood Vs BMC relief to Sonu Sood judgment reserved by the court)

अशात आज अभिनेता सोनू सूदने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. शरद पवार आणि सोनू सूद यांच्या भेटीबद्दल सविस्तर माहिती समोर आलेली नसून ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे. सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने जूहू पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमुळे चर्चेत आला होता. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची देखील सोनू सूदनं यापूर्वी भेट घेतली होती.

अवैध बांधकामप्रश्नी उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सोनू सूद याच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले, असा आक्षेप नोंदवला पालिकेने नोंदवला होता. सोनू सूदनं यानंतर मुंबई उच्च न्यायालयात बीएमसीच्या नोटीसला अभिनेता सोनू सूदने आव्हान दिले होते. उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला 13 जानेवारीपर्यंत सोनू सूद विरोधात काहीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. सोनू सूदच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यामध्ये मात्र, यावर निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.

लॉकडाऊनमधील कामांच रोहित पवारांकडून कौतुक

अभिनेता सोनू सूदनं लॉकडाऊन काळात गरजूंना मदत केली होती. सोनू सूदच्या या कामाचं कौतुक करण्यासाठी रोहित पवारांनी जून महिन्यात सूदच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. ‘घर जाना हैं’ हे स्थलांतरित मजुरांचे केवळ तीन शब्द ऐकून हजारो मजुरांना स्वगृही सुखरुप पोहोचवणाऱ्या सोनू सूद यांची त्यांच्या घरी भेट घेतली” अशी माहिती रोहित पवार यांनी ट्विटरवरुन दिली होती.

“तुम्हाला भेटून आनंद झाला भाऊ. चांगले काम चालू ठेवा. तुमचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. प्रत्येक स्थलांतरितासाठी उपलब्ध राहण्याचा मी प्रयत्न करत आहे. शेवटची स्थलांतरित व्यक्ती घरी पोहचेपर्यंत मी परिश्रम घेत राहीन” अशा शब्दात सोनूने रोहितचे आभार व्यक्त केले.

बीएमसीच्या तक्रारीत काय?

बीएमसीने दिलेल्या तक्रारीत म्हटलं, “सोनू सूद यांनी स्वत: जमिनीच्या वापरावर बदल केला आहे. त्याशिवाय निश्चित प्लानमध्ये अतिरिक्त निर्माण करुन रहिवासी इमारतीला हॉटेलच्या इमारतीत रुपांतरीत केलं. यासाठी त्यांनी अथॉरिटीकडून आवश्यक ती परवानगी घेतलेली नाही.”

इतकंच नाही तर बीएमसीने सोनू सूदवर नोटीसकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप केला आहे. सिविक अथॉरिटीने सांगितलं, नोटीस दिल्यावरही ते अनधिकृत निर्माण करत राहिले. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना (एमआरटीपी) कायदा कलम 7 अंतर्गत गुन्हा केला आहे. (Sonu Sood Vs BMC relief to Sonu Sood judgment reserved by the court)

संबंधित बातम्या : 

Sonu Sood | अभिनेता ‘सोनू सूद’ राजकीय आखाड्यात उतरुन शड्डू ठोकणार!

Kangana Ranaut | कंगना रनौतच्या याचिकेवर हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी

(Sonu Sood Vs BMC relief to Sonu Sood judgment reserved by the court)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.