मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मात्र, सोनू सूद हा त्याच्या चित्रपटांपेक्षाही अधिक त्याच्या मदतीच्या स्वभावासाठी ओळखला जातो. सोनू सूद हा लोकांच्या मदतीला गेल्या काही वर्षांपासून धावून येताना दिसत आहे. सोनू सूद हा मागेल त्याला मदत करताना देखील कायमच दिसतो. विशेष म्हणजे कोरोनाच्या अत्यंत वाईट काळामध्ये लोकांच्या मदतीला सोनू सूद धावून आला. मागेल त्याला मदत करताना सोनू सूद हा दिसला होता. लोकांना त्यांच्या घरी येण्यासाठी वाहतूकीची सेवा देताना देखील सोनू सूद दिसला. विशेष म्हणजे सोशल मीडियावर (Social media) देखील जे कोणी त्याला मदत मागतो, त्याला सोनू सूद मदत करतो.
सोनू सूद याने आतापर्यंत अनेक लोकांना नोकऱ्या या दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सोनू सूद याच्या नावाने एक थाळी लॉन्च करण्यात आलीये. विशेष म्हणजे सोनू सूद याच्या नावाने लॉन्च करण्यात आलेल्या थाळीमध्ये एकाच वेळी 20 लोक हे एकत्र बसून आरामात जेवण करू शकतात. ही एक अत्यंत मोठी थाळी आहे. याला सोनू सूदचे नाव देण्यात आले आहे.
नुकताच आता सोनू सूद याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सोनू सूद हा तीन मजुर लोकांच्या ग्रुपमध्ये अचानक जातो आणि त्यांना म्हणतो की, तुम्ही लोक काय करत आहात? आणि बिडी का ओढत आहेत? मजा येते का बिडी ओढण्यात. यावर एक व्यक्ती हा सोनू सूद याला हो म्हणताना देखील दिसत आहे.
चलते-चलते बीड़ी बुझ गयी??
याद रख बीड़ी पीना सेहत के लिए हानिकारक है। ? pic.twitter.com/meskAzh5yC
— sonu sood (@SonuSood) July 15, 2023
दुसरा एक व्यक्ती म्हणतो की, माझी तर बिडी वाऱ्यामुळे विझली आहे. त्यावर उत्तर देत सोनू सूद म्हणाला की बरं झाले…कारण बिडी ओढली तर आयुष्य कमी होते. यावेळी बिडी न ओढण्याचे सांगताना सोनू सूद हा दिसत आहे. जर जास्त आयुष्य जगायचे असेल तर बिडी ओढणे सोडून द्या असेही सोनू सूद हा त्या व्यक्तींना म्हणताना दिसत आहे.
विशेष म्हणजे सोनू सूद याचे बोलणे ऐकून हे तीनही व्यक्ती आपण परत कधीच बिडी ओढणार नसल्याचे सांगताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या जवळच्या बिडी जप्त करताना देखील सोनू सूद हा दिसतोय. तुम्ही कुठे राहतात हे विचारताना देखील सोनू सूद हा दिसतोय. यावेळी ते राजस्थान येथील राहणारे तीन व्यक्ती असल्याचे कळत आहे. आता सोनू सूद याचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.