लग्नाआधीच प्रसिद्ध अभिनेत्री गरोदर? प्रेग्नन्सी किटचा फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का!

लग्नाआधी अभिनेत्रीने दिली 'गुड न्यूज'? फोटो पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

लग्नाआधीच प्रसिद्ध अभिनेत्री गरोदर? प्रेग्नन्सी किटचा फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का!
नित्या मेननImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 7:38 PM

मुंबई- लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रींमध्ये नित्या मेननचं नाव आवर्जून घेतलं जातं. नित्या सध्या तिच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. नित्याने इन्स्टाग्रामवर एका प्रेग्नन्सी किटचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत. लग्नाआधीच नित्या गरोदर आहे का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. या फोटोवर अनेकांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. काहींनी नित्याला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.

प्रेग्नन्सी रिझल्ट पॉझिटिव्ह दाखवणाऱ्या किटचा फोटो नित्याने पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘..अन् चमत्काराची सुरुवात’. त्यामुळे नित्याला नेमकं काय म्हणायचंय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या पोस्टवर अनेकांनी नित्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Nithya Menen (@nithyamenen)

नित्या खरंच गरोदर आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र ही पोस्ट तिच्या खासगी आयुष्याशी संबंधित नाही. एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नित्याने अशी पोस्ट केल्याचं कळतंय. मात्र या चित्रपटाचा विषय किंवा त्याचं नाव अद्याप जाहीर करण्यात आलं नाही.

नित्याने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. दहा वर्षांची असताना तिने ‘हनुमान’ या इंग्रजी भाषेतील चित्रपटात काम केलं होतं. तिने आतापर्यंत मल्याळम, तेलुगू, तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

नित्याला पत्रकारितेत करिअर करण्याची इच्छा होती. मात्र हळूहळू त्या क्षेत्रातील आवड कमी झाल्यानंतर तिने चित्रपटांकडे मोर्चा वळवला. पुण्यातील FTII मधून तिने सिनेमॅटोग्राफीचं शिक्षम पूर्ण केलं.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.