अवघ्या 26 व्या वर्षी कोरियन अभिनेत्रीचा मृत्यू

टीव्ही नाटकांच्या पलीकडे अभिनेत्रीने आपली अष्टपैलूता दाखवली. मृत्यूच्या वेळी तिला वेडिंग इम्पॉसिबल नावाच्या आणखी एका के-ड्रामामध्ये कास्ट करण्यात आले होते, जे निर्मितीच्या टप्प्यात होते.

अवघ्या 26 व्या वर्षी कोरियन अभिनेत्रीचा मृत्यू
Jung Chae-YullImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 7:06 PM

सियोल: दक्षिण कोरियन अभिनेत्री आणि मॉडेल जंग चाये युल हिचे वयाच्या 26 व्या वर्षी निधन झाल्याने मनोरंजन सृष्टीत खळबळ उडाली आहे. चे-युल मंगळवारी तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली आणि त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 26 सप्टेंबर 4 रोजी जन्मलेल्या तिने एक मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून नाव कमावले. 2016 मध्ये डेव्हिल्स रनवे या मालिकेतील भूमिकेमुळे तिने पहिल्यांदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि नंतर 2020 मध्ये झोम्बी डिटेक्टिव्ह या नाटकातील बे यून-मी च्या भूमिकेसाठी तिला अधिक ओळख मिळाली.

स्क्विड गेमचे प्रसिद्ध जंग हो योन, किम जिन क्यूंग आणि सोंग हे ना यांच्यासोबत जंग चाये युल हा शोमधील एक नवीन चेहरा होता. झोम्बी डिटेक्टिव्ह ही एक वेगळी शैली होती ज्यात जंग चाये युल ची एक नवीन बाजू दर्शविली गेली. 21 सप्टेंबर 2020 रोजी या काल्पनिक टेलिव्हिजन मालिकेचा प्रीमियर झाला आणि चोई जिन-ह्यूक, पार्क जू-ह्यून आणि क्वान ह्वा-वून मुख्य भूमिकेत होते. बे यून-मी च्या भूमिकेत जंग चाये युलच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले.

टीव्ही नाटकांच्या पलीकडे अभिनेत्री म्हणून जंग चाये युल हिने आपली अष्टपैलूता दाखवली. मृत्यूच्या वेळी तिला वेडिंग इम्पॉसिबल नावाच्या आणखी एका के-ड्रामामध्ये कास्ट करण्यात आले होते, जे निर्मितीच्या टप्प्यात होते.

Jung Chae-Yull

Jung Chae-Yull

जंग चाये युलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लोकप्रियता मिळवली. तीन दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आलेल्या फोटोजमध्ये अभिनेत्री म्युजिक आणि ड्रिंक्सचा आस्वाद घेताना दिसत आहे. लिफ्टमध्ये तिने काही फोटोही काढलेले आहेत. ती अनेकदा जगाच्या विविध भागांतील स्वत:चे फोटो शेअर करत असे. तिच्या निधनाच्या बातमीनंतर चाहत्यांनी चाय-युलच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टकडे वळून तिच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती व्यक्त केली.

एका मीडिया रिपोर्ट्सच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्री 11 एप्रिल केएसटी रोजी तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली होती. तिच्या एजन्सीने एका निवेदनाद्वारे तिच्या मृत्यूला दुजोरा दिला आणि शोक व्यक्त केला आणि खुलासा केला की तिचे कुटुंबीय खाजगी अंत्यसंस्कार करणार आहेत.

जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.