ब्रेकअपमुळे नाही संपलं नातं, तब्बू हिच्यासोबत असलेल्या अफेअरवर Nagarjuna म्हणाला…

'ती माझ्यासाठी कायम एक...', तब्बू हिच्यासोबत असलेल्या अफेअरवर अभिनेता नागार्जुन याची मोठी प्रतिक्रिया... ब्रेकअपमुळे नाही संपलं दोघांचं नातं..

ब्रेकअपमुळे नाही संपलं नातं, तब्बू हिच्यासोबत असलेल्या अफेअरवर Nagarjuna म्हणाला...
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 11:24 AM

मुंबई : झगमगत्याविश्वात कायम चर्चेत असणारी एक गोष्ट म्हणजे सेलिब्रिटींचे प्रेम प्रकरण. आज देखील अनेक नव्या सेलिब्रिटींच्या अफेअरची चर्चा रंगलेली असते. काही सेलिब्रिटींनी तर स्वतःच्या नात्याचा स्वीकार देखील केला आहे. पण ८० – ९० च्या दशकातील सेलिब्रिटींचे अफेअर, ब्रेकअप, वाद… इत्यादी गोष्टींची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेली असते. एक काळ असा होता जेव्हा अभिनेता तब्बू आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली. दोघांनी जवळपास एकमेकांना १० वर्ष डेट केलं. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. कारण तेव्हा नागार्जुन विवाहित होता. पण जेव्हा दोघांचं ब्रेकअप झालं, तेव्हा त्यांचे मार्ग वेगळे झाले. विभक्त झाल्यानंतर दोघांनी त्यांच्या नात्याचं सत्य देखील सर्वांना सांगितलं.

२०१७ साली नागार्जुन याने अभिनेत्री तब्बू हिच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं. तब्बू हिच्याबद्दल नागार्जुन म्हणाला, ‘तब्बू माझी एक चांगली मैत्रीण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही चांगले मित्र आहोत. जेव्हा मी २२ वर्षांचा होतो, तेव्हा तब्बू फक्त १६ वर्षांची होती. आमच्या मैत्रीबद्दल मी जेवढं सांगेल तेवढं कमी आहे…’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘आमच्या नात्याबद्दल लपवण्यासारखं काहीही नाही. जेव्ह तुम्ही तब्बूचं नाव घेता तेव्हा मी फार आनंदी होतो. जेव्हा मी असं काही बोलतो, तेव्हा ते वाचायला तुम्हाला आवडतं. हा तुमचा दृष्टीकोण आहे… माझ्यासाठी तब्बू एक चांगली व्यक्ती आहे… ती माझी उत्तम मैत्रीण आहे आणि कायम राहिल… ‘ असं नागार्जुन म्हणाला होता… तेव्हा देखील दोघांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला होता.

हे सुद्धा वाचा

फक्त नागार्जुन यानेच नाही तर, तब्बूने देखील ‘कॉफी विथ करण’ याच्या शोमध्ये त्यांच्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. अभिनेत्री म्हणाली होती की, ‘नागार्जुन माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. नागार्जुन याच्यासोबत असलेलं माझं नातं फार महत्त्वपूर्ण आहे… आमच्या नात्यासाठी मला कोणत्या लेबलची गरज नाही… त्याच्यासोबत असलेलं माझं नातं कधीही संपू शकत नाही…’ असं तब्बू म्हणाली होती.

तब्बू हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीचं अनेक सेलिब्रिटींसोबत नाव जोडण्यात आलं. पण कोणतंही नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. प्रसिद्धी, संपत्ती असताना देखील अभिनेत्री आजही एकटी आयु्ष्य जगते. तब्बू कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यामुळे चर्चेत असते. आजही अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही… तब्बू हिचा आगामी सिनेमा पाहण्यासाठी चाहते आजही प्रतीक्षेत असतात.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.