Video | गाडीतून उतरल्यानंतर थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडताना दिसले रजनीकांत, लखनऊमध्ये पार पडली गुप्त बैठक
साऊथ स्टार रजनीकांत हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहेत. त्यांचा जेलर हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. या चित्रपटाने कमाईमध्ये मोठा धमाका केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रजनीकांत हे दिसले होते.
मुंबई : साऊथ स्टार रजनीकांत (Rajinikanth) हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या जेलर या चित्रपटामुळेत जोरदार चर्चेत आहेत. जेलर हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय आणि धमाका करताना दिसत आहे. जेलर चित्रपट (Movie) रिलीज झाल्यानंतर रजनीकांत हे थेट बद्रीनाथ मंदिरात नतमस्तक होताना देखील दिसले. इतकेच नाही तर बद्रीनाथ मंदिरात पूजा आणि आरती देखील रजनीकांत यांनी केली. याचे काही फोटो (Photo) आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले. बद्रीनाथ मंदिरात रजनीकांत यांना पाहून लोकांनी मोठी गर्दी देखील केली.
नुकताच आता रजनीकांत यांचे काही फोटो आणि व्हिडीओ हे तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे रजनीकांत यांचे व्हायरल होत असलेले हे फोटो आणि व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील आहेत. रजनीकांत हे नुकताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटण्यासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी गेले होते.
विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ हे रजनीकांत यांचे स्वागत करण्यासाठी बाहेरच उभे असल्याचे देखील बघायला मिळाले. योगी आदित्यनाथ यांना पाहून त्यांच्या पाया पडताना देखील रजनीकांत हे दिसले. आता योगी आदित्यनाथ आणि रजनीकांत यांच्या भेटीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.
#WATCH | Actor Rajinikanth meets Uttar Pradesh CM Yogi Adityanath at his residence in Lucknow pic.twitter.com/KOWEyBxHVO
— ANI (@ANI) August 19, 2023
परंतू योगी आदित्यनाथ आणि रजनीकांत यांच्या भेटीमध्ये नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली याबद्दल काही खास माहिती ही मिळू शकली नाहीये. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बाॅलिवूडच्या कलाकारांच्या भेटी मोठ्या प्रमाणात घेताना सतत दिसत आहेत. यामुळेच या भेटीला एक वेगळी महत्व प्राप्त झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच बाॅलिवूड स्टार अक्षय कुमार याने देखील योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. याचे काही फोटो आणि व्हिडीओ पुढे आले होते. या फोटो आणि व्हिडीओनंतर अनेकांनी थेट अक्षय कुमार याला टार्गेट करण्यास देखील सुरूवात केली होती. रजनीकांत आणि योगी आदित्यनाथ यांच्या भेटीनंतर अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. चित्रपट निर्मात्यांची देखील काही दिवसांपूर्वीच मुंबईत एक बैठक हीयोगी आदित्यनाथ यांनी घेतली होती.