चित्रपटात शरद केळकर आणि शान्वी श्रीवास्तवची जोडी चर्चेत; साऊथची ही सुंदरी आहे तरी कोण?
समित कक्कड दिग्दर्शित 'रानटी' चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यावर शरद केळकर आणि दक्षिण भारतीय अभिनेत्री शान्वी श्रीवास्तवची जोडी चर्चेत आली आहे. शान्वी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात भूमिका साकारत आहे. तिचा अभिनय आणि शरद केळकरचा लूक प्रेक्षकांना पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. 22 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. टिझरला प्रेक्षकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे.
![चित्रपटात शरद केळकर आणि शान्वी श्रीवास्तवची जोडी चर्चेत; साऊथची ही सुंदरी आहे तरी कोण? चित्रपटात शरद केळकर आणि शान्वी श्रीवास्तवची जोडी चर्चेत; साऊथची ही सुंदरी आहे तरी कोण?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/10/22-1.jpg?w=1280)
समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ चा टिझर नुकताच रिलीज झाला. टिझर रिलीज झाल्यानंतर चर्चा आहे ती शरद केळकरच्या लूक आणि डायलॉगची. तसेच टिझर पाहून अनेकांनी चित्रपट पाहण्याची उत्सुकताही व्यक्त केली. चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र शरद केळकरसोबतच चर्चा आहे ती एका सुंदरची. साऊथच्या एका अभिनेत्रीने ‘रानटी’ या चित्रपटातून थेट मराठीत धमाकेदार एन्ट्री केली आहे. या दाक्षिणात्य अभिनेत्री आणिच मॉडेल शान्वी श्रीवास्तव. ती पहिल्यांदाच मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण करते आहे.
‘रानटी’ चित्रपटात शान्वी महत्वपूर्ण भूमिकेत
‘रानटी’ चित्रपटात शान्वी ‘मैथिली’ या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘रानटी’च्या निमित्ताने मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला. सोबतच दिग्दर्शक समित कक्कड सारख्या नावाजलेल्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभवही कमालीचा असल्याचा ती सांगते. दरम्यान मराठी चित्रपटात दिसलेल्या नवीन आणि सुंदर चेहऱ्याबद्दल चर्चा तर रंगणारच होती आणि झालही तसंच चित्रपटाचे पोस्टर जेव्हा रिलीज झाले तेव्हा शरद केळकरसोबतच शान्वीच्या पोस्टरची तेवढीच चर्चा होती.
![Shanvi Srivastava](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/10/4-6-14.jpg)
Shanvi Srivastava
शान्वी बद्दल काही गोष्टी
शान्वीने 2012 मध्ये बी. जयाच्या तेलुगू चित्रपट ‘लव्हली’मधून प रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. तसेच ती शिकत असतानाच तिच्या दुसऱ्या तेलगू चित्रपट अड्डामध्ये ती फॅशन डिझायनिंगची विद्यार्थिनी म्हणून दिसली आणि तिच्या अभिनयाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसादही मिळाला. 2014 मध्ये, तिने चंद्रलेखा या हॉरर कॉमेडी चित्रपटाद्वारे कन्नडमध्ये पदार्पण केले आणि तिच्या अभिनयासाठी सकारात्मक पावतीही तिला मिळाली. तिने दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले. तिला कन्नड फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीही नामांकन मिळाले होते. शान्वी इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केलेल्या कन्नड अभिनेत्रींपैकी एक आहेत. शान्वी ‘लव्हली’नंतर ‘अड्डा’,’प्यार में पडीपोयने’, ‘भले जोडी’,’मुफ्ती’,’चंद्रलेखा’ यासारख्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ती झळकली.
![Shanvi Srivastava](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/10/shanvi-srivastava-5348x9504-v0-gepago8su1pa1.webp)
Shanvi Srivastava
शान्वीचा जन्म 8 डिसेंबर 1993 रोजी वाराणसी येथे झाला, तिने शालेय शिक्षण चिल्ड्रन कॉलेज आझमगड , उत्तर प्रदेश येथे केले आणि मुंबईतील ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये पदवी आणि बी.कॉम पदवी पूर्ण केलं आहे . शान्वीला एक मोठा भाऊ आणि एक मोठी बहीण आहे. शान्वीची मोठी बहिण विदिशा देखील नावाजलेली अभिनेत्री आहे . दरम्यान रानटी चित्रपटातून शान्वी साऊथप्रमाणेच मराठी प्रेक्षकांची मने जिंकणार का हे पाहणे रंजक असणार आहे.
![Ranati movie](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/10/1080-2.jpg)
Ranati movie
दरम्यान ‘रानटी’ चित्रपटाच्या टिझरला नक्कीच कलाकारांसह चाहत्यांचीही पसंती आणि भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. टिझरवर चाहत्यांनी भरभरून कमेंट करच चित्रपट पाहण्याची उत्सुकता असल्याचे सांगितले आहे. हृषिकेश कोळी यांनी लिखाण केलं आहे तर, अजित परब यांनी संगीत दिलं आहे. तसेच अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत आहे आणि सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण. चित्रपटाच्या टिझरवरून चित्रपटाची तांत्रिक बाजू किती भक्कम आहे हे नक्कीच दिसून येत.22 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.