बरीच वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ‘या’ साऊथ सेलिब्रिटींचे मार्ग झाले वेगळे
फिल्म इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत, जे एकत्र काम करता करता प्रेमात पडले. डेट करताना त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. मात्र जेव्हा सोबत राहू लागले, तेव्हा त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. या यादीत एक विवाहित अभिनेतासुद्धा सहभागी आहे.
मुंबई : 25 नोव्हेंबर 2023 | चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतात. अफेअर, लग्न, घटस्फोट आणि लिव्ह इन रिलेशनशिप.. अशा अनेक गोष्टी त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. केवळ बॉलिवूडच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही असे बरेच कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या खासगी आयुष्यामुळे सर्वांचं लक्ष वेधलं. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतरही त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. आज हे सेलिब्रिटी आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत. असे कोणते कलाकार आहेत, ते पाहुयात..
नयनतारा आणि प्रभूदेवा- या यादीत सर्वांत आधी नाव येतं नयनतारा आणि प्रभूदेवाचं. या दोघांचं नातं इंडस्ट्रीत खूप चर्चेत होतं. नयनतारा आणि प्रभूदेवा हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. डेट करतानाच दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी प्रभूदेवा विवाहित होता. इतकंच नव्हे तर नयनतारामुळेच प्रभुदेवाच्या पत्नीने त्याला घटस्फोट दिल्याचं म्हटलं जातं. प्रभूदेवासाठी नयनताराने स्वत:चा धर्मदेखील बदलला होता.
श्रुती हासन आणि सिद्धार्थ- कमल हासन यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रुती हासन ही अभिनेता सिद्धार्थला डेट करत होती. ‘रंग दे बसंती’ फेम सिद्धार्थ आणि श्रुती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. ‘ओह माय फ्रेंड’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.
View this post on Instagram
सिद्धार्थ आणि समंथा- श्रुती हासनशी ब्रेकअप झाल्यानंतर दोन वर्षांनंतर सिद्धार्थ हा अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला डेट करू लागला होता. सिद्धार्थचं नाव बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. समंथा रुथ प्रभू, सोहा अली खान आणि श्रुती हासन या तिघींना त्याने डेट केल्याचं म्हटलं जातं. 2003 मध्ये सिद्धार्थने बालमैत्रीण मेघनाशी लग्न केलं होतं. मात्र 2007 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. सध्या सिद्धार्थ अभिनेत्री अदिती राव हैदरीला डेट करतोय.
समंथा आणि नाग चैतन्य- जवळपास दहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर समंथा आणि नाग चैतन्यने लग्न केलं. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच दोघांनी घटस्फोट घेतला. लग्नाआधी हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. समंथा आणि नाग चैतन्य ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय आणि चर्चेतली जोडी आहे.