अनन्या पांडे आणि आदित्य राय कपूर हे गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या रिलेशनमुळे जोरदार चर्चेत होते. दोघे एकमेकांना डेट करताना दिसले. हेच नाही तर काही दिवसांपूर्वीच विदेशात खास वेळ घालवताना आदित्य राय कपूर आणि अनन्या पांडे दिसले. सध्या जोरदार एक चर्चा रंगत आहे की, आदित्य राय कपूर आणि अनन्या पांडे यांनी ब्रेकअप केले आहे. मार्च महिन्यातच यांचे ब्रेकअप झाले. मात्र, याबद्दल अजून दोघांपैकी कोणी काही खुलासा केला नाहीये. अनन्या पांडे ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
अनन्या पांडे हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर आता एका अभिनेत्रीसोबत आदित्य राय कपूरचे नाव जोडले जातंय. हेच नाही तर दोघांचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. अनन्या पांडे हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर आदित्य राय कपूर हा सारा अली खान हिला डेट करत असल्याचे सांगितले जातंय.
हेच नाही तर एका बर्थडे पार्टीत दोघे चिल करताना दिसले. या बर्थडे पार्टीत दोघे एकत्र पोहचले होते. आदित्य राय कपूर आणि सारा अली खान यांच्यामधील जवळीक्ता चांगलीच वाढल्याचे बघायला मिळतंय. खरोखरच सारा अली खान आणि आदित्य राय कपूर हे एकमेकांना डेट करत आहेत, याबद्दल तसा अजून काही खुलासा झाला नाहीये.
सारा अली खान हिचे नाव शिखर पहाडिया याचा भाऊ वीर पहाडिया याच्यासोबत देखील जोडले जातंय. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता अनन्या आणि आदित्यने ब्रेकअप केले. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये चंकी पांडे यांनी म्हटले होते की, अनन्या माझ्यापेक्षाही अधिक पैसे कमावते, तिला जे योग्य वाटते ते ती करते, मी तिला रोखणारा कोण?
मध्यंतरी एक चर्चा होती की, आदित्य राय कपूर आणि अनन्या पांडे हे लवकरच लग्न करणार आहेत. आदित्य आणि अनन्या यांनी काही दिवसांपूर्वीच खास असे फोटोशूट केले होते. आदित्य राय कपूर आणि अनन्या पांडे यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडत असत, यांच्या ब्रेकअपमुळे सर्वांनाच नक्कीच मोठा धक्का बसला आहे. अनन्या पांडे हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.